#एटीएम ची सोय!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील खानापूर को-आँप बॅकेने यावर्षी ९९ लाख. २३ हजार ८२३ रूपयांचा निव्वळ ऩफा मिळविला असुन सभासद संख्या १४,३७६ इतकी असुन भाग भांडवल ३कोटी,४५लाख,२१हजार २५० रूपये,तर ठेवी ८८ कोटी,
३लाख,१०हजार९१३ ,कर्ज ६४कोटी,३४लाख,७३हजार,६८०रूपये,
थक बाकी ६ कोटी,६७लाख,५३ लाख ४८७ रूपये, खेळते भांडवल १११ कोटी,९७ लाख,५ हजार,३३५ रूपये
अशी,माहिती चेअरमन अमृत शेलार यानी सोमवारी दि.२१ सप्टेंबर रोजी खानापूर जांबोटी रोडवरील शुभम गार्डन मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या १०४ व्या.वार्षिक सभेत बोलताना दिली.
व्यासपिठावर उपाध्यक्ष मेघशाम घाडी,
संचालक परशराम गुरव,डाॅ.सी जी पाटील,रमेश नार्वेकर,विजय गुरव,मारुति पाटील,विठ्ठल गुरव,मारूती गुरव,अनिल बुरूड,बाळाराम शेलार,दिपक चव्हाण व इतर सल्लागार उपस्थित होते.
चेअरमन अमृत शेलार म्हणाले की,
खानापूर को-आँप बॅकेत आधुनिक बॅकेच्या सर्व सेवाउपलब्ध असुनपारदर्शक
व्यवहार व विश्वासार्हता ही बॅकेची खास ओळख आहे. यावर्षी बॅकेत एटीएमची सोय करण्यात आली आहे.त्यानिमित्त एटीएमचा शुभारंभ करण्यात आला.
प्रारंभी मान्यवरांच्याहस्ते दीप प्रज्वलन व फोटो पुजनाने सभेची सुरूवात झाली.
यावॆळी प्रास्ताविक मॅनेजर विजय साळुंखे यानी केले.
अहवाल वाचन एस व्ही देसाई यानी केले.
यावेळी सभासदानी आपल्या आडचणी वार्षिक सभेत मांडल्या. त्याचे संचालक मंडळकडुन त्याची उत्तरे देण्यात आली.
ज्या सभासदाची वयाची ७० वर्षे पूर्ण झाली आहेत व ४० वर्षाहुन अधिक काळ बॅकेचे सभासद आहेत.अशा सभासदाना वार्षिक एक हजार रूपये मानधन देण्यात आले.
बॅकेत सेफ डिपाॅझिट लाॅकरचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
बॅकेच्या सभासदांच्या इयत्ता १० वी,१२ वी व पदवी परीक्षेतील गुणवत्ता प्राप्त मुला मुलीचा गौरव ही करण्यात आला.
वार्षिक सभेला सभासदानी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती.आभार प्रदर्शनाने सभेची सांगता झाली.
