संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील देसाई गल्लीतील बाल मंडळ सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाचा यंदाचा अमृत महोत्सवी ७५ वा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात होत असुन बाल गणेशोत्सव मंडळाने गेल्या अनेक वर्षाची परंपरा कायम जपली आहे.तसेच गणेशोत्सवाच्या माध्यमातुन धार्मिक व सामाजिक उपक्रम राबविण्याची परंपरा मंडळाने जपली आहे.
त्यानिमित्त रविवारी दि.२० रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले .
सकाळी गणहोम होऊन, भाविकासाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले,
यावेळी महाप्रसादासाठी भाजपचे राज्य कार्यकरणी सदस्य प्रमोद कोचेरी, माजी तालुका अध्यक्ष व विद्यामान भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजय कुबल व भाजप नेते राजेंद्र रायका व विविध पक्षाचे नेते व कार्यकर्ते तसेच अनेक भक्तानी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती.
आज रविवारी विविध स्पर्धाचे ही आयोजन करण्यात आले आहे.