संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील देसाई गल्लीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मुर्तीचे आगमन बुधवारी दि.९ रोजी सायंकाळी झाले.
या गणेश मुर्ती आगमन सोहळ्याला खानापूर तालुक्याच्या माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डाॅ.अंजलीताई हेमंत निंबाळकर यानी प्रामुख्याने उपस्थिति दर्शविली होती.
प्रारंभी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने उपस्थितांचे स्वागत करण्यात आले होते.
यावेळी भगव्या ध्वजाचे व गाड्याचे पूजन माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉ अंजलीताई निंबाळकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले, त्यानंतर बाप्पाच्या मुर्ती अनावरण करण्यात आले.
यावेळी शिवस्मारक चौकात विद्यूत रोशनाई सह फटाक्यांच्या आवाजात गणपती बाप्पांचे स्वागत झाले.
आगमन सोहळ्याला शहरातील नागरिक तसेच अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने मा जी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉ अंजलीताई निंबाळकर यांचे भगवी शाल व पांढरी गांधी टोपी देऊन त्याचा सत्कार केला.
