#शेतकर्यांचे लाखो रूपयाचे नुकसान, वनखात्याकडुन पाहणी !
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील अति जंगलभागातील निलावडे ( ता.खानापूर ) गावच्या सर्वे नंबर ४२ मधील जवळपास पाच ते सहा एकर शेत जमिनीतील सुमारे १०० ते १५० टन उस हत्तीनी फस्त केला असुन शेतकर्याचे लाखो रूपयाचे नुकान झाले आहे.
या परिरात गेल्या काही दिवसा पासुन दोन हत्तीनी मोठाउच्छाद मांडवी आहे.त्यामुळे शेतकरी वर्ग हैरान झाला आहे.त्याचे जगणे मुश्किल झाले आहे.
याघटनेची माहिती मिळताच निलावडे ग्राम पंचायतीचे माजी सदस्य विनायक मुतगेकर यानी आरएफओ श्रीकांत पाटील यां च्या शी संपर्क सा धुन लागलीच शेतावर जाऊन पाहणी केली.यावेळी माजी ग्राम पंचायत सदस्य महादेव कवळेकर, रमेश नाईक उपस्थित होते.
घटनास्थळी जाऊन पाहणी करताच निलावडे हद्दीतील ५ एकर जमीनीतील जवळ पास १५० एकर जमिनीतील ऊसाचे नुकसान पाहुन आर एफ ओ श्रीकांत पाटील म्हणाले की एकाचवेळी उसाचे इसके नुकसान झालेेली घटना ही पहिल्यांदाच पहात आहे.
सदर शेतकर्याला जास्तीतजास्त नुकसान भरपाई देण्यासाठी माझा प्रयत्न राहुल असे आश्वासन दिले.तेव्हा शेतकर्यानी कागद पत्राची लवकरात लव कर देण्याची कृपा करावी.
यावेळी माजी ग्राम पंचायत सदस्य विनायक मुतगेकर म्हणाले की, तुटपूंजी नुकसान भरपाई देण्यापेक्षा तुमचे हत्ती तुमचे जंगली प्राणी तुम्ही सांभाळा.
पिकाचे नुकसान होणार नाही यासाठी प्रयायी व्यवस्था करावी.दरवर्षीच हत्तीकडुन शेतकर्याचे प्रचंड नुकसान होणार मात्र नुकसान भरपाई तुटपूंजी मिळणार त्यामुळे शेतकरी कंगाल झाला आहे. असे सां गीत ले
