#वागळे काँलेज व श्री चौराशीदेवी संगीत कलामंच याच्या सयुंक्त विद्यामाने!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर लोकमान्य संचालित वागळे पदवी पूर्व काॅलेज व श्री चौराशीदेवी संगीत कलामंच यांच्या संयुक्त विद्यामाने उद्या सोमवारी दि.३१ आँगस्ट रोजी सकाळी ९वाजता संगीत भजन स्पर्धा लोकमान्य भवनात आयोजित करण्यात आल्या आहेत.
या स्पर्धा पुरूष गट,महिला गट,व विद्यार्थी गट अशा तीन गटात होणार आहेत.
विजयी स्पर्धकाना पुरूष गटात अनुक्रमे: ७००१रू,६००१रू,५००१रू,४००१रू,३००१ रू,२००१रू,१५०१रूअशी सात बक्षिसे देण्यात येणार आहेत. वेळ १५मिनीटे व प्रवेश फी५०१ रू,
महिला गटात अनुक्रमे: २५००रू,२१००रू,२०००रू,१८०१रू,१६०१रू,१५०१रू,१२०१रू अशी सात बक्षिसे देण्यात येणार आहेत. वेळ १५मिनीटे व प्रवेश फी५०१ रू,
विद्यार्थी गटात अनुक्रमे २५०१रू,२००१रू,१५०१रू अशी तीन बक्षिसे देण्यात येणार आहेत.प्रवेश फी नाही.त्याच बरोबर मानचिन्ह देण्यात येणार आहे.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंढरी परब व्हा.चेअरमन लोकमान्य एज्यूकेशन सोसायटी व संचालक लोकमान्य मल्टी पर्पज सोसायटी हे उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे उदघाटन खानापूर तालुक्याचे आमदार यांच्याहस्ते होणार आहे.तर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व फोटो पुजन होणार आहे.
तरी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
