#बैठकीत हेब्बाळच्या केसरेकर दांपत्याच्या प्राणघातक हल्ल्याचा तीव्र निषेध!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका निवृत्त मराठी शिक्षक संघटनेची बैठक संत ज्ञानेश्वर मंदिरात नुकताच पार पडली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष डी.एम.भोसले होते. प्रारंभी ए आर मुतगेकर यांनी प्रास्ताविक केले.
बैठकीत हेब्बाळच्या केसरेकर दांपत्यावर कुपवाड सांगली येथे १५ आँगस्ट रोजी झालेल्या प्राण घातक हल्ला झाला.त्याचा तीव्र निषेध करण्यात आला.यावेळी या घटनेतील आरोपी फरीद शेख याला फाशीची शिक्षा देण्यात यावी.तसेच केसरेकर कुटूंबाचे महाराष्ट्र सरकारने पालकत्व स्विकारून आवश्यक ती मदत करावी.असा ठराव बैठकीत करण्यात आला.
यावेळी बैठकीत कोलिकच्या कै गोपाळ गावडे यां च्या पत्नीला मिळणारी पेन्शन लवकारत लवकर लागु करावी, यासाठी कणकुंबी येथील कॅनरा बॅक मॅनेजर यांना निवेदन देण्याचा ठराव मंजुर करण्यात आला.
बैठकीचे औचित्य साधुन संघटनेचे अध्यक्ष डी एम भोसले,सचिव ए एम पाटील,
सभासद एम के काकतकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
बैठकीला सभासद बी एन पाटील जे बी पाटील, एम पी कदम ,जी डी देसाई,वाय बी पाटील , व्ही.यू.देसाई,व इतर निवृत्त शिक्षक उपस्थित होते.
आभार एन जे गुरव यानी मानले.
