#हेस्काॅमअभियंताचे आवाहन!
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरासह तालुक्यातील नागरीकांनी आपल्या घरांचे, कार्यालयाचे,व्यवसायाचे तसेच इतर वीज बीले येत्या ३१ आँगस्टच्या आत भरा.अन्यथा वीजप्रवाह ( वीज कनेक्शन ) बंद ठेवण्यात येईल.असे आवाहन खानापूर हेस्काॅम खात्याचे कार्यकारी अभियंत्यानी केले आहे.
खानापूर तालुक्यातील अनेक वीज ग्राहकानी आपल्या घरांचे, कार्यालयाचे, व व्यवसायाचे तसेच इतर वीज बीले मागील महिण्याची व तसेच चालु महिण्याची ही वीज बीले त्वरित भरा.असे आवाहन करण्यात आले आहे.
काही वीज ग्राहकांनी अनेक महिण्याची वीज बीले भरलेली नाहीत. त्यामुळे हेस्काॅम खात्याला अनेक समस्याना तोंड द्यावे लागत आहे.
तेव्हा तालुक्यातील वीज ग्राहकानी आपली वीज बीले ३१ आँगस्टच्या आत भरून हेस्काॅम खात्याला सहकार्य करावे.असे आवाहन करण्यात आले आहे.

