संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील शेतकर्यानी प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या आधार कार्डचे ई केवायसी लवकरात लवरक करून घ्यावे.अन्यथा आपल्या आधार कार्डाची ई केवायसी झाली नाही तर पुढील हल्का मिळणे कठीण आहे.असे आवाहन खानापूर कृषी सहाय्यक निर्देशक डी बी चव्हाण यानी पत्रकाराशी बोलताना दिली.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, खानापूर तालुक्यात जवळपास ४० हजार हुन अधिक शेतकरी प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी आहेत.
तेव्हा ज्या शेतकर्यांची आधार ई केवायसी अद्याप पूर्ण झालेली नाही.,त्याना पुढील किसान सम्मान निधी योजनेचा लाभ मिळण्यास आडचणी येऊ शकते, त्यामुळे सर्व लाभार्थीनी दुर्लक्ष न करता प्रधान मंत्री किसान सन्मान योजना आधार कार्डाची केवायसी करून घेणे अत्यंत गरजेचे आहे.
यासाठी शेतकर्याची ई केवायसी पूर्ण करण्यासाठी कृषि विभागाच्या वतीने प्रत्येक ग्राम पंचायत पातळीवर कृषी सखीची नियुक्ती करण्यात आली आहे.कृषी सखी घरोघरी जाऊन शेतकर्याना ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मदत करणार आहे.
त्याचबरोबर शेतकर्याना ग्राम वन केंद्र अथवा अधिकृत खासगी साय़बर केंद्रातुन ही ई केवायसी करून घेण्याची सुविधा उपलब्ध आहे.
तेव्हा खानापूर तालुक्यातील सर्व प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकर्यानी आपल्या आधार कार्डाची ई केवायसी पूर्ण झाली की नाही.याची खात्री करून घ्यावी.अन्यथा नाही झाल्यास त्वरित करून घ्यावी.
असे आवाहन खानापूर तालुका कृषि सहाय्यक निर्देशक डी.बी.चव्हाण यानी केले आहे.

