#आमदारांच्याहस्ते वितरण!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील कृषी खात्याच्या कार्यालयात बुधवारी दि . २६ रोजी कृषि विभागाच्या कृषी यांत्रिकरण योजना व लघू सिंचन योजनेंर्तगत खानापूर तालुक्यातील जवळपास वीस हुन अधिक शेतकर्या ना विविध कृषी यंत्राचे वाटप करण्यात आले.
यावेळी कृषी अधिकारी डी बी चव्हाण यानी उपस्थितांचे स्वागत करून बोलताना म्हणाले की, सामान्य शेतकर्याना कृषि यंत्रसामग्रीवर ५० टक्क्यापर्यत अनुदान तर मागीसर्वगीय शेतकर्यासाठी ९० टक्क्यापर्यत अनुदान उपलब्ध आहे. असे सांगुन या योजनेमुळे शेतकर्याना कमीत कमी खर्चात व कमी वेळेत कामे करण्यास मदत होते.
अशी माहिती दिली.
यावेळी शेतकर्याना आमदारांच्या हस्ते यंत्राचे वितरण करण्यात आले.
यावेळी लोकप्रतिनिधी, शेतकरी , खानापूर कृषिविभागाचे सहायक संचालक डी.बी चव्हाण,दीपा वडेर,हिंदी विभागाचे बसय्या चिकमठ्ठ,मंजुनाथ केंच्चनावर, वइतर कर्मचारी उपस्थित होते.


