#सिंगीनकोप मराठीशाळेत पालकमेळावा!
,संदेशन क्रांती न्यूज:

खानापूर प्रतिनिधी
इंग्रजी शिक्षण म्हणजे भारतीय संस्कृती नव्हे.इंग्रजी शाळेत विद्यार्थ्याना घरात हव्या असलेली संस्कृती म्हणजे संध्याकळच्या वेळी घरी दिवा लावुन अभ्यासाला बसा असे कधीच सांगत नाही.इंग्रजी शाळेचा विद्यार्थी नमस्कार करायला शिकलाच नाही.शिकवन केवळ मातृभाषेच्या शाळातुनच मिळते.थोरामोठ्याशी बोलताना त्याचा मानसन्मान कसा करावा.हे केवळ मातृभाषेच्या मिळते.तेव्हा पालकानी मुलाना मातृभाषेतुन शिक्षण द्यावे.ऐवढे नव्हे तर मातृभाषेतुन शिक्षण हेच लहान मुलाना भविष्यात फायद्याचे होते. तेव्हा पालकांनी आपल्या मुलाना मराठी शाळेत मातृ भाषेतुन शिक्षणासाठी धडपडावे.अशी चर्चा सिंगीनकोप पूर्व प्राथमिक मराठी शाळेत शनिवारी दि.२२ रोजी पालक मेळाव्यात करण्यात आली .
पालक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक प्रकाश कुंभार होते.
प्रास्ताविक अथिती शिक्षक नामदेव कुंभार यानी केले.तर मुख्याध्यापक प्रकाश कुंभार यानी उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी पालकानी मुलाना दिलेला गृहपाठ हा रोजच देत जावा.यासाठी आम्ही मुलांच्याकडुन तो रोजच्या रोज करून घेऊ, महिण्याच्या महिण्याला मुलांची प्रगती वाढण्यास प्रयत्न व्हावा.मुलाना रोज शाळेत पाठविण्यासाठी आमचा नेहमी प्रयत्न राहील .असे सांगीतले.
यावेळी पालक मेळाव्याला एस डी एम सी उपाध्यक्षा सौ.चित्रा कुंभार व सर्व सदस्य व सदस्या , पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार कन्नड शिक्षिका सौ . एल डी नलवडी यानी मानले.
