#खानापूर तहसीलदार मार्फत जिल्हाधिकार्याधिकार्याना निवेदन!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथे दि.१५ आँगस्ट रोजी घडलेल्या दुर्दैवी हिंसक घटनेत मृत्यु झालेल्या हेब्बाळ (ता.खानापूर ) केसरेकर कुटूंबातील सौ.मनीषा मोहन केसरेकर व त्याचे पती मोहन नागाप्पा केसरेकर यांच्या कुटूंबीयाना लवकरात लवकर आर्थिक मदत,पिडीत नुकसान भरपाई व मोफत कायदेशीर सहाय्य उपलब्ध करून द्यावे.आशा मागणीचे निवेदन गुरूवारी दि.२० रोजी खानापूर म ए समितीच्यावतीने तहसीलदार दुंडाप्पा कोमार यांच्या मार्फत जिल्हाधिकार्याना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे.कि, मृत दांपत्य हे मुळचे हेब्बाळ ( ता. खानापूर )गावचे असल्याने त्यांच्या कुटूंबावर या घटनेनंतर अंत्यविधी,वैद्यकिय व कादेशीर प्रक्रिया, प्रवास तसेच उदरनिर्वाहाचा अतिरिक्त आर्थिक भार पडला आहे.
तेव्हा शासनाच्या नियमानुसार मृतांच्या कुटूंबियांना तातडीचे आनुदान मंजुर करावे.तसेच अंतर्गत कायदेशीर वारसांना नुकसान नुकसानभरपाई मिळविण्या तातडीने कार्यवाही करावी.तसेच कुटूंबियाना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली यांच्यामार्फत मोफत कायदेशीर सल्ला,व प्रतिनिधीत्व उपलब्ध करून द्यावे.एफआयआर ,मृत्यू ,प्रमाण ,पोस्ट मँर्टिम अहवाल ,पंचनाम, व नुकसान
भरपाईसाठी आवश्यक कागदपत्रे मिळविण्यासाठी सरकारने मदत करावी.
अशी मागणी केली आहे.
तसेच मृतांच्या कायदेशीर वारसांना सामाजिक सुरक्षा, आर्थिक सहाय्य,निवारा,शिक्षण व पुनर्ववसनाच्या उपलब्ध योजनाचा लाभ मिळावा, तसेच सांगली आणि बेळगाव जिल्हा प्रशासनासह खानापूर तहसील कार्यालयाने समन्वय साधुन महाराष्ट्र व कर्नाटक शासनाच्या मदतीचा लाभ केसरेकर कुंटूंबियाना मिळवुन द्यावा.अशी मागणी करण्यात आली आहे.
पता पत्नीच्या मृत्यूमुळे कुटूंबावर आलेल्या संकटाची तीव्रता लक्षात घेऊन या प्रकरणाकडे मानवी दृष्टिने आर्थिक मदत ,नुकसान भरपाई, शासकीय लाभ लवकरात लव कर मिळवुन द्यावा.अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदन देताना म ए समितीचे माजी आमदार दिगंबर पाटील, सरचिटणीस आबासाहेब दलवी,गोपाळ पाटील , पांडुरंग सावंत, प्रकाश चव्हाण,बी बी पाटील, पुंडलिक पाटील,संजीव पाटील, म्हात्रू धबाले,आदी समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
