“गेलात आम्हा सोडुनी, राहिल्या मागे आठवणी,
आठवणी मनी स्मरूणी,मार्ग करू आक्रमण या जीवणी”
गर्लगुंजी (ता.खानापूर )गावचे सुपुत्र, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष, गावपंच कमिटीतील उत्कृष्ट व्यक्तिमत्त्व, सीमा लढ्यातील खंबीर नेतृत्व आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते फकिरा जैनु सावंत यांचे वय ९२व्यावर्षी मंगळवारी दि.२८ जूलै रोजी निधन झाले. . त्यानिमित्त त्याचा थोडक्यात परिचय:
कै.फकिरा जैनू सावंत यांचा जन्म गर्लगुंजीच्या सावंत शेतकरी कुटूंबात झाला.शेतकरी कुटूंबात राहुन ही त्यानी मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि सीमाभागातील मराठी बांधवांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष केला. महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेतृत्व करताना त्यांनी निस्वार्थपणे समाजकारण केले.आणि सीमासत्याग्रही. म्हणून त्यांची खानापूर तालुक्यात आज ओळख आहे.
गावाच्या विकासासाठी, सामाजिक ऐक्यासाठी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी ते सदैव तत्पर राहिले. त्यांच्या कार्यामुळे त्यांनी गावकऱ्यांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले.
त्यांच्या जाण्याने गर्लगुंजी गावाने एक ज्येष्ठ मार्गदर्शक, समाजहितासाठी झटणारा नेता आणि सर्वसामान्यांचा आधारवड गमावला आहे. त्यांनी केलेले कार्य, विचार आणि समाजसेवेचा वारसा कायम स्मरणात राहील.