संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील कोंगळा म्हादाई, मलप्रभासह हालात्री नदी पात्रातील पाणी
पातळीत रविवार पासुन सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे बरीच वाढ झाली आहे.
तर सोमवारी खानापूर हेम्माडगा मार्गावरील हालात्री नदीच्या पात्रात पाण्याची वाढ होऊन नदीच्या पुलावर तीन फुट पाणी आल्याने काहीकाळ यामार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली.त्यामुळे वाहनधारकाना
पर्यायी मार्ग म्हणून खानापूर असोगा मणतुर्गा,अथवा खानापूर- लोंढा- रामनगर यामार्गावरून वहातुक करावी.असे सांगण्यात आले.
खानापूरातील मलप्रभा नदीच्या पात्रातील पाण्याची पातळी वाढत आहे.तर कोंगळा जवळील म्हादाई नदीच्यापात्रात वाढ झाली
तसेच हालात्री नदीच्या पुलावर पाणी आल्याने कोणीही वाहनधारकानी आपला जीव धोक्यात घालुन वाहने नेण्याचा प्रयत्न करू नये.असे आवाहन करण्यात आले आहे.
