संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका प्राथमिक शाळा शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण व सत्कार समारंभ नुकताच पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानापूर तालुका सरकारी नोकर संघाचे अध्यक्ष बी एम येळ्ळूर होते.
व्यासपिठावर मार्गदर्शक म्हणून कर्नाटक राज्य प्राथमिक शिक्षक संघटना बेंगळुरू उपाध्यक्ष एस डी गंगण्णावर, कर्नाटक राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे खजिनदार आसिफ अत्तार होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आनंदगौडा काद्रोळी , जिल्हा कार्यादर्शी मल्लिकार्जुन सिद्धनगौडर, उपाध्यक्ष वाय एम पाटील, जिल्हा गौरवाध्यक्ष शेखर करंबळकर ,बेळगाव ग्रामीण तालुका प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष गुळपण्णावर , बेळगाव ग्रामीण तालुका शिक्षक संघाचे पदाधिकारी श्रीमाहूत , संचालक किरण करंबळकर, शट्टुपा चौगुले व इतर पदाधिकारी, बेळगाव शहर प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सुनील देसुरकर व सर्व पदाधिकारी, बेळगाव जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष फकीर स्वामी मठ, खानापूर तालुका एस सी एस टी संघाचे अध्यक्ष वाय एन कोलकार उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना कर्नाटक राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष एस डी गंगण्णावर यांनी शिक्षक संघ हा, शिक्षकांसाठी असून शिक्षकांच्या समस्या पदाधिकाऱ्यांनी सोडवल्या पाहिजेत संघाचे पदाधिकारी हे शिक्षकासाठी असतात त्यांना कोणत्याही समस्या येऊ नयेत याकडे काळजी घेणे जरुरीचे आहे. कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघ आपल्या पाठीशी आहे.त्याचबरोबर सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
खानापूर तालुका राज्य नोकर संघाचे अध्यक्ष बी एम येळूर यांनी देखील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन दिले खानापूर तालुका हाती दुर्गम असल्याने शिक्षकापर्यंत आपण पोहोचले पाहिजेत त्यांच्या समस्या जाणून घेऊन वेळोवेळी त्या समस्या सोडवल्या पाहिजेत यासाठी आपले सदैव सहकार राहील असे ते म्हणाले . त्याचबरोबर खानापूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे नूतन अध्यक्ष जे पी पाटील आणि बेळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष वाय एम पाटील यांनी देखील आपले विचार व्यक्त केले. बेळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष आनंदगौडा काद्रोळी आणि उपाध्यक्ष मल्लिकार्जुन सिद्धनगौडर यांनी वेळोवेळी जिल्हा स्तरावर आलेल्या सूचना आणि सहकार्य आपल्यापर्यंत पोहोचवले जाईल अशी ग्वाही दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम व्ही चोर्लेकर आणि श्री एम एस पूजार यांनी केले.आभार डी एस सोनारवाडकर यांनी मानले.
कार्यक्रमाचे औचित्य साधुन पदाधिकार्याचा व इतर मान्यवरांचा शाल, पुष्पहार घालुन सत्कार करण्यात आला.
खानापूर तालुका प्राथमिक शिक्षक संघ पदाधिकारी
अध्यक्ष जे पी पाटील,कार्यदर्शी एम एस पुजार ,जिल्हा उपाध्यक्ष वाय एम पाटील,जिल्हा कार्यदर्शी बी बी मेदार,खजिनदार बी एम पाटील
,जिल्हा संघटना कार्यदर्शी एस एम पाटील, जिल्हा संघटना कार्यदर्शी एम व्ही चोर्लेकर,
उपाध्यक्ष प्रवीण पाळेकर , राज्य संघटना कार्यदर्शी एम के पाटील,
गौरवाध्यक्ष डी एस सोनारवाडकर ,
कार्याध्यक्ष
एम व्ही कुंभार
महिला उपाध्यक्षा जे ए मुरगोड,संघटना कार्यदर्शी एस टी पाटील,
संघटना कार्यदर्शी एम व्ही पाटील ,सहकार्यदर्शी जी एस बडीगेर – महिला सहकार्यदर्शी श्रीमती ए ए फर्नांडिस – सहकार्यदर्शी
एम आर नदाफ
, महिला कार्यदर्शी श्रीमती जयश्री ढेकोळी – महिला सहकार्यदर्शी
श्रीमती पौर्णिमा नाईक ,सहकार्यदर्शी एम आर पाटील ,संचालक एम एस बैलवाड , संचालक एम के गुरव ,संचालक
एच एल करंबळकर, संचालक
बी ए बिरादार , संचालिका श्रीमती एस वाय पाटील , संचालिका
श्रीमती प्रेमा एस कुलकर्णी आदीची निवड झाली.

