संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
रामगुरवाडी (ता. खानापूर ) येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक ए आर भोसले हे २९ वर्षाच्या प्रदीर्घ शिक्षकी सेवेतुन शुक्रवारी दि.३१ जुलै रोजी सेवानिवृत्त होत आहे.
त्यानिमित्त त्याचा थोडक्यात परिचय:
ए आर भोसले यांचा जन्म दि. २४ जूलै १९६६ साली भोज ( ता. निपाणी) येथे
झाला.त्यानी निपाणी येथे टी सी एच कोर्स करून सन १९९७ साली खानापूर तालुक्यातील निलावडे येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेतुन शिक्षकी सेवेला प्रारंभ झाला.या शाळेत गेली १४ वर्षे त्यानी सेवा बजावली, तेथून त्याची बदली सन २०११ साली कापोली के.सी.( ता.खानापूर) येथील मराठी शाळेत झाली. तेथे त्यानी एक वर्षे सेवा बजावली.तेथून त्यांची बदली सन २०१२ साली बांदेकरवाडा येथील मराठी शाळेत झाली. या शाळेत २०१८ पर्यत सहा वर्षे सेवा बजावली. तेथून त्याना दि.२ आँगष्ट २०१८ रोजी मुख्याध्यापक पदी बढती वर रामगुरवाडी (ता.खानापूर ) येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेत बदली झाली.याशाळेत त्यानी ८ वर्षे मुख्याध्यापक म्हणून सेवा बजावली.आणि ३१ जुलै २०२६ रोजी ते सेवा निवृत्त झाले.
त्यानिमित्त रामगुरवाडी शाळेत एसडीएमसीच्यावतीने सत्कार सोहळा होत आहे.