#अखिल कर्नाटक रयत संघाचे उपाध्य किशोर मिठारीचे निवेदन!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
राज्यातील दुष्काळ ग्रस्त जिल्हासह खानापूर तालुक्याला दुष्काळ निवारण निधी तात्काळ मंजुर करावा. व शेतकर्याच्या इतर मागण्या पूर्ण करा .
अशा मागणीचे निवेदन अखिल कर्नाटक रयत संघटनेचे उपाध्यक्ष किशोर मिठारी यानी खानापूर ग्रेड टू तहसीलदार एस के तंगोळी याना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे,की राज्यासह खानापूर तालुक्यात यंदा मान्सुन पाऊस दरवर्षीपेक्षा कमी झाला असुन पिकाची वाढ कमी झाली आहे.नुकसान ही झाली आहे.तर काही भागात पेरण्याही झाल्या नाहीत.त्यामुळे खानापूर तालुका दुष्काळग्रस्त तालुका म्हणून घोषित करावा.व प्रति एकर ३०हजार रूपयाची नुकसान भरपाई देण्यात यावी. व शेतकर्याचे कर्ज पूर्ण पणे माफ करावे. तसेच केंद्रीय पीक विमा योंजनेंतर्गत शेतकरी विमा महामंडळाकडे प्रथम रक्कम भरून शेतकर्याना पीक विमा नुकसान भरपाई देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन सादर केले.
यावेळी ग्रेड टू तहसीलदार एस के तंगोळी यानी निवेदनाचा स्विकार करून सरकारकडे पाठवुन देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी शेतकरी बिस्टापा सुंबळी, गोपाळ आगशिमणी,शिवलिंग चन्नापूर,रूद्रपा विरापूर, पुंडलिक कुरंगुडी, यल्लापा बेळगावकर आदी उपस्थित होते.

