#तालुका पंचगॅरंटी योजना अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी याचे प्रयत्न!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका गॅरेंटी योजनेचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांच्याप्रयत्नाने हिरे हट्टिहोळी गावाला बससेवा सुरू व्हावी य़ासाठी प्रयत्न केले.
या निमित्त शुक्रवारी दि. २४ रोजी अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांच्याहस्ते बससेवेला प्रारंभ झाला.
यावेळी अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी, विवेक तडकोड व बस ड्रायव्हर महाबूब पारस कंडक्टर मणियार यांचा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी सुर्यकांत कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले खानापूर ते एम के हुबळी येथे जाणारी बस व्हाया हिरेमनोळी गावाला चालू केली. बरेच दिवसापासून या गावातील आमच्या गॅरंटी योजनेचे सदस्य विवेक तडकोड तसेच गावातील पंचमंडळींच्याकडून या बसची मागणी होत होती. ती आज पूर्ण करण्यात आली. सरकारकडून गॅरेंटी योजनेची स्थापना करण्यात आली व आम्हाला माजी आमदार डॉ अंजलीताई निंबाळकर यांच्या शिफारशीवरून मला अध्यक्ष व विवेक तडकोड यांना गॅरंटी योजनेचे सदस्य करण्यात आले,व तालुक्यात योजनेची स्थापना झाली, तालुक्यातील ज्या समस्या असतील मी अध्यक्ष या नात्याने जेवढे होईल तेवढे प्रयत्न करून कोणतेही काम असो ते पूर्ण करून दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे आणि कोणतीही समस्या असेल तिथे मी स्वतः लक्ष घालून कोणत्याही अधिकाऱ्याकडे काही कोणीही मला काम सांगितले तर मी ते जातीने लक्ष घालतो. व काम करून देतो. आपलं कोणतेही काम असो आमचे ऑफिस खानापूर तालुका पंचायत येथे आहे. तेथे आपण संपर्क साधावा व आपले काम करून घ्यावे तसेच माझ्याकडून सर्वपक्षीय लोक काम करून घेऊन जातात त्यासाठी आपण कधीही गॅरंटी योजना अध्यक्ष ला काम सांगा ते मी पूर्ण करीन असं आश्वासन देतो यावेळी बसच्या उद्घाटन प्रसंगी गॅरंटी योजनेचे सदस्य विवेक तडकोड,राजू तळवार ग्रामपंचायत पिडिओ, बाबू देसनुर, अशोक नेमन्नावर,शिवनाप्पा घाडीकोप,बाबु पच्चर,निंगापा होसमनी,कोमल करेन्नावर,निंगापा देवलत्ती, हिरे हट्टिहोळी गावातील पंचमंडळी व महिलावर्ग तसेच युवक वर्ग आणि ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

