#वनखात्याने बिबट्याचा बंदोबस्त करावा, निवेदनाव्दारे मागणी!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
माडीगुंजी( ता.खानापूर ) परिसरात गेल्या पंधरा दिवसापासुन बिबट्याचे दर्शन होत असल्याची चर्चा नागरीकातुन होत आहे.
पहाटेच्या वेळी फिरावाय गेलेल्या नागरीकांच्या दृष्टीस बिबट्या पडला.तसेच पहाटेच्यावेळी शेतकरी शेताकडे जाता ना ही शेतकर्याच्या दृष्टि पहला असल्याचे शेतकर्यातुन सांगीतले जाते.
माडीगुंजी गावातील कुत्र्याचाही बिबट्याने फडशा पाडला आहे.
माडीगुंजी भागात जनावरे मोकळ्या गोट्यात बांधली जातात, त्यामुळे बिबट्यापासुन जनावराना धोका संभवतो आहे.शिवाय कोणावरही बिबट्याचा हल्ला होण्याआधी वनखात्याने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशा मागणीचे निवेदन माडीगुंजी ग्रामस्थांच्यावतीने गुंजी वनखात्याचे उपवलय अधिकार्याना देण्यात आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते पंकज कुट्रे, राव जी बीरजे आदी उपस्थित होते.
