#इदलहोंड,सिंगीनकोप गावाना ही बससेवेची सोय !
संदेश. क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील माळअंकले, झाडे अंकले गावाना बसचे दर्शन झाले नव्हते, एवढेच नव्हेतर गेल्या शेकडो वर्षापासून बस पासून वंचित असलेल्या माळअंकले,व झाडअंकले, या गावांना मंगळवारी दि.२१ पासून बससेवेला खानापूर तालुक्याचे गॅरेंटी योजनेचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांच्या हस्ते चालना मिळाली.यानिमित्त
खानापूर तालुक्याचे गॅरेंटी योजनेचे अध्यक्ष सुर्यकांत कुलकर्णी, गॅरंटी योजनेचे सदस्य रुद्राप्पा पाटील, बसचे ड्रायव्हर एम. वाय. पाटील, कंडेक्टर आर. डी .पाटील, यांचा सत्कार गावचे पंचमंडळी व ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी खानापूर तालुका गॅरेंटी योजनेचे अध्यक्ष सुर्यकांत कुलकर्णी मनोगत व्यक्त करताना म्हणाले, आपल्या गॅरंटी योजनेची शिफारस कर्नाटक सरकारकडे, खानापूर तालुक्याच्या माजी आमदार डाँ अंजली निंबाळकर यांच्या शिफारशी नुसार , माझी गॅरंटी योजनेच्या खानापूर तालुका अध्यक्षपदी निवड झाली, व माझ्याबरोबर १५ लोकांची सदस्य पदी निवड करण्यात आली, त्यामध्ये आपल्या गावचे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते रुद्राप्पा पाटील यांची गॅरंटी योजनेच्या सदस्य पदी निवड झाली, तेव्हापासून आम्ही माळअंकले, गावासाठी बस यावी यासाठी वेळोवेळी गॅरेंटी योजनेचे सदस्य रुद्राप्पा पाटील यांनी मासिक बैठकीमध्ये मांडत होतो. त्यामुळे या गावाला आज पासूनबससेवा सुरुवात होत आहे .
हीच बससेवा इदलहोंड सिंगीनकोप गावाना होणार आहे. तेव्हा इदलहोंड ते माळअंकले पर्यंत जी रस्त्यावर झाडे झुडपे येत आहेत ती बसला अडचण होऊ नये त्यासाठी गावातील नागरिकांनी आपण स्वतःहून श्रमदानातून रस्ता सुरळीत करावा. काही अडचण येऊ नये व आपले गावाला बस कायमस्वरूपी जात येत राहावी ,असे आव्हान करण्यात आले, यावेळी गावातील महिला मंडळ व पंचमंडळी तसेच विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .
गावात पहिल्यांदाच बस आल्यामुळे व आनंद झाल्याने गावच्यानागरीकानी आनंद व्यक्त केला.
यावेळी या उद्घाटनच्या प्रसंगी गावातील गॅरंटी योजनेचे सदस्य रुद्राप्पा पाटील ,शिवाजी होसुरकर, मारुती निडगलकर, यल्लाप्पा होसुरकर माजी ग्रामपंचायत सदस्य, रेखा होसुरकर माजी ग्रामपंचायत सदस्य, मोनाप्पा गुरव, सदानंद होसुरकर, सुनील चोपडे, पांडुरंग नीडगलकर, निकिता गावडे, शाळेच्या मुख्याध्यापिका उडकेकर, शिक्षिका रेणुका पाटील, शिक्षिका एस के पाटील, व ग्रामस्त, गावातील महिला मंडळी, तसेच गावातील पंचमंडळी या प्रसंगी उपस्थित होती.
