संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
निडगल ( ता.खानापूर ) येथील श्री विठ्ठल रुक्मिणी सेवा संघाच्या श्रीक्षेत्र पंढरपूर येथील भक्त निवासाचा वास्तुशांती व उदघाटन सोहळा शुक्रवारी दि.२४ जिला रोजी आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी कार्यक्रमाचे उदघाटन खानापूर तालुक्याचे आमदारांच्याहस्ते होणार आहे.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमोद कदम राहणार आहेत.
तुलसीवृदावन पुजन माजी मेत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याहस्ते होणार आहे.तर श्री विठ्ठल रुखमाई फोटोपुजन माजी आमदार अरविंद पाटील यांच्याहस्ते होणार आहे.
दीप प्रज्वलन शिवराजदादा जाधव,दत्तात्रय देसाई,डाँ विद्याशंकर राव,प्रा.भरत तोपिनकट्टी, मुख्याध्यापक अनिल कदम,विठ्ठल करंबळकर,तानाजी कदम, यांच्याहस्ते होणार आहे.
तर ज्ञानेश्वरी फोटो पुजन संजय तोपिनकट्टी व विविध फोटोचे सौ स्मिता देसाई,राव साहेब पाटील,परशराम कदम,देवाप्पा कदम,प्रवीण पाटील,विद्याधर कदम,यल्लापा सुतार,विनायक मुतगेकर माजी ग्रा पं. उपाध्यक्ष निलावडे.रविंद्र कदम आदीच्या हस्ते होणार आहे.
या वेळी ध्वजारोहण गणपत पाटील यांच्या
हस्ते होणार आहे.
तर कार्यक्रमाला विविध मान्यवर व निडगल गावचे नागरिक उपस्थित राहणार आहेत.