#सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यत!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील डुक्करवाडी ११० के व्ही उपकेंद्रात दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने आज शनिवारी दि.१८ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजे पर्यत वीजपुरवठा बंद राहणार आहे.
डुक्करवाडी कॆ. व्ही. ११ फीडर मध्ये कलमेश्वरनगर, दादोबानगर ,पारिश्वाड क्राॅस, खानापूर बाजारपेठ,रविवार पेठ,ढोर गल्ली,मारूतीनगर,सय्यद गल्ली,बस्ती गल्ली, केंचापूर गल्ली,नाईक गल्ली,लक्ष्मीनगर,बुरूड गल्ली,जांबोटी क्राँस ,शिवाजी नगर,
समर्थनगर,हलकर्णी,गांधीनगर,हिंदूनगर,
हुडको काॅलनी,आझादनगर तसेच इतर इतर परिसरातील वीजपुरवठा खंडीत होणार आहे.
अशी माहिती खानापूर तालुका हेस्काॅमचे सहाय्यक कार्यकारी अभियंते प्रवीण बरगाले यानी दिली आहे.
