संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
गर्लगुंजी( ता.खानापूर) गावचे सुपूत्र माजी ग्राम पंचायत सदस्य प्रसाद विठ्ठल पाटील यांचा डाॅक्टर दिनानिमित्त केएलई संस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला.
प्रसाद पाटील यानी आठवड्यामध्ये कमीतकमी ४ ते ५ रूग्णा ना वेळेत उपचारासाठी ऍडमिट करून १५०० पेक्षा जास्त खानापूर तालुका आणि इतर ठिकाणच्या नागरिकांचे प्राण वाचविण्याचे काम आणि वेगवेगळ्या स्कीम्स मधून मोफत शस्त्रक्रिया करून देण्याचे काम त्याचबरोबर स्वतः 33 वेळा रक्तदान आणि कित्येक जणांना इतर माध्यमातून रक्त पुरविण्याचे काम गर्लगुंजी ग्राम पंचायत चे सदस्य प्रसाद विठ्ठल पाटील यांनी केले आहे.त्यांनी स्वतः इंजिनीयर आहेत पण डॉक्टर दिना दिवशी त्यांचा सन्मान केएलई सारख्या नामांकित संस्थेकडून झाला संस्थेचे संचालक डॉ.राजशेखर, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर नवीन एम,जिल्हा मुख्य कुटुंब नियोजनाधिकारी डॉ.विश्वनाथ भोवी,मेडिकल सुपरिटेंडेट संजय कंबार,संस्थेचे विद्यार्थी,डॉक्टर आणि इतर स्टाफ सर्व पब्लिक रिलेशन ऑफिसर उपस्थित होते
यावेळी डॉ.श्रीकांत मैत्री, डॉ.अजय काळे,डॉ. खोत डॉ.जमादार, डॉ. पोटे, डॉ .केदार
त्याचबरोबर समाजसेवक नागेश नार्वेकर यांचा ही सत्कार करण्यात आला,डॉ.राजशेखर यांनी उत्तम असे मार्गदर्शन केले डॉक्टर नी स्वतःची काळजी घेतली पाहिजेत,योग्य ट्रीटमेंट दिली पाहिजेत आज कालचे पेशंट सगळे गुगल चॅट जीपीटीचे अर्धवट अभ्यास करून येतात त्यांना समजावून सांगावे अर्धवट माहिती बरी न्हवे असे त्यांनी सांगितले.
खानापूर तालुक्यातून जे पेशंट येतात त्यांना बिल कमी करावे खास करून गरीब पेशंट असल्यास आणि कोणती स्कीम मिळत नसल्यास आम्ही मागणी करू तशी जास्तीत जास्त बिल मध्ये सवलत द्यावी कारणं काहीवेळा पेशंट ना ऍडमिट करत असताना सुरुवातीचे पैसे सुधा आम्हाला आपल्या खिशातून घालावे लागतात असे प्रसाद पाटील म्हणाले,त्याच बरोबर हॉस्पिटल मध्ये न्यूरोलोजी आणि कार्डियाक डिपार्टमेंट सुरू करावे,त्याचबरोबर रुग्णासाठी फिरती बस उपलब्ध करावी अशी विनंती प्रसाद पाटील यांनी आपल्या भाषणातून यावेळी केली.गाव आणि खानापूर तालुका परिसरातून ६ गावे दत्तक घेतली आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिर ठेवली त्याबद्दल आभार ही मानले.