संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
माळ अंकले ( ता.खानापूर) येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेचे सहशिक्षक पुंडलिक ईश्वर कुंभार हे ३१ वर्षाच्या शिक्षकी सेवेतुन ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले.त्यानिमित्त शनिवारी दि.४ जुलै रोजी त्यांचा सत्कार सोहळा खानापूरातील मधुवन सभागृहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माळ अंकले सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेचे एसडीएमसी अध्यक्ष रवळू निडकलकर होते.
व्यासपिठावर निवृत्त मुख्याध्यापक ए बी मुरगोड, कृष्णा कुंभार, बाळासाहेब दौलतकर,राजू देसाई,यल्लापा कोलकार,नारायण साळुंखे,बीईओ सुप्रिडेट श्री वाघमारे शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष वाय.एम.पाटील,शिक्षक सोसायटीचे चेअरमन महेश कुंभार,रामाण्णा कुंभार (गोवा), व्ही जी तारीहाळकर,आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष के.एच कौदलकर यानी केले.तर स्वागत व सत्कार मुर्तीचा परिचय संघटनेचे कार्यदर्शी बी बी चापगावकर यानी करून दिला.
कार्यक्रमाची सुरूवात स्वागत गीताने झाली.उपस्थित पाहुण्याच्याहस्ते दिप प्रज्वलन व फोटो करून करण्यात आले.
यावेळी शाळा व एसडीएमसी कमिटीच्यावतीने सत्कारमुर्ती निवृत्त शिक्षक पुंडलिक कुंभार यांचा सपत्नीक शाल, पुष्पहार व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
त्याच बरोबर इदलहोंड केंद्रातील विविध शाळाच्यावतीने तसेच मुख्याध्यापक
,शिक्षक,आणि तालुक्यातील विविध शिक्षकांच्यावतीने सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे औचित्य साधुन महाराष्ट्र सरकारचा मराठी भाषा गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी सत्कारला उत्तर देताना सत्कारमुर्ती पुंडलिक कुंभार म्हणाले की,३१ वर्षाच्या शिक्षकी सेवेत सन १९९६ साली पहिली शाळा नंदगड येथील संत मेलगे ही असुन अनेक वर्षे या शाळेत सेवा बजावली,
याकाळात अनेक विद्यार्थी माझ्या हातुन घडले.येथून मला शिक्षकी सेवेचा खरा अनुभव आला.त्यामुळे शाळेच्याप्रगतीसाठी मी सतत कार्यरत राहिलो,अनेक विकासाची
कामे झाली.याचे मला समाधान वाटले.
तेथून माजी बदली माळ अंकले शाळेत झाली.याशाळेत असताना मला जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला.याशाळेत मला विद्यार्थ्याकडुन मान सन्मान मिळाला. केवळ दोन शाळेत शिक्षकी सेवा करून जो आनंद मिळाला याचे सारखे दुसरे सुख नाही. असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी उपस्थित मान्यवरानी त्याच्या शिक्षकी सेवेतील कार्याबद्ल गौरव उद्गार काढले.
यावेळी मुख्याध्यापक एस टी पाटील,ओ एन मादार, बबन पाटील,महेश हेब्बाळकर,जे पी पाटील,गोविंद पाटील,प्रकाश कुंभार,गोपाळ पाटील,रमेश कवळेकर, बापू दळवी,सतीश पाटील,एम एन कुंभार,यल्लापा कुंभार,एस.के.पालकर,प्रभाकर गावडे ,व्ही एन कुंभार, नंदकुमार कुंभार व सी आर पी ,विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन के एच कौंदलकर यानी केले. तर आभार बी बी चापगावकर यानी मानले.

