खानापूर प्रतिनिधी
निडगल (ता.खानापूर ) येथील सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळेत शनिवारी दि.२७ रोजी शिक्षकाचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त शिक्षक एम पी. कदम उपस्थित होते.
तर व्यासपिठावर निवृत्त कन्नड शिक्षक एस. एल कंबळीमठ, बढती मुख्याध्यापक . ओ. एन. मादार ,नवीन बढती मुख्याध्यापक पी. डी. कुंभार या सत्कारमुर्ती उपस्थित होत्या.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सीआरपी श्री. मुल्ला, एस डी.एम.सी.अध्यक्ष.विनायक कदम, उपाध्यक्षा सौ. रेणुका लोहार, तसेच सर्व सदस्य, सदस्या उपस्थित होत्या.
यावेळी खानापूर तालुका शिक्षक संघाचे संचालक पिराजी पाखरे,सतीश हळदणकर, शिक्षक सोसायटी चेअरमन एम.व्ही. कुंभार, व्हाईस चेअरमन डी एस .सोनारवाडकर,माजी अध्यक्ष वाय एम,, माजी चेअरमन .बबन पाटील, संचालक जे.पी.पाटील, तोपिनकट्टी मराठी शाळेचे मुख्याध्यापक एस.डी.पाटील आणि बरगांव केंद्रातील सर्व मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी उपस्थित होते.
प्रारंभी शाळेचे ज्येष्ठ शिक्षक
प्रारंभी एस.आर.पाटील यांनी प्रास्ताविक केले. तर कार्यक्रमाची सुरूवात दिपप्रज्वलन व फोटो पुजनाने झाली.
यावेळी सत्कारमुर्ती निवृत्त कन्नड शिक्षक एस एल कंबळीमठ, बढती मुख्याध्यापक ओ एन मादार, नवीन मुख्याध्यापक पी डी कुंभार यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल,पुष्हार
व श्रीफळ देऊन सत्कार केला.यावेळी उपस्थित मान्यवरांची व सत्कार मुर्तीची भाषणे झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. रूपाली चिट्टी यांनी केले तर आभार सौ. जंगली यांनी मानले.
