#शेतकर्याला ५० हजार रूपयाचा फटका!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्याच्या अति घनदाट जंगलातील देगाव गावात दिवसाढवळ्या हत्तीनी सामाजिक कार्यकर्ते आनंद गावडे यां च्या बागेतील नारळ, केळी, सुपारी आदी तसेच शिवारातील भाताचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान केले असुन शेतकर्याला ५० हजार रूपयाचा आर्थिक फटका बसला आहे.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते आनंद गावडे यानी बोलताना सांगीतले की, खानापूर तालुक्याच्या अतिघनदाट जंगलातील देगाव गावा शेजारी असलेल्या केळी, नारळ, सुपारीच्या बागेत भर दिवसा ढवळ्या हत्तीनी घुसुन प्रचंड नुकसान केले आहे.
त्यामुळे देगाव गावच्या शेतकर्यातुन, नागरीकातुन भितीचे वातावरण पसरले आहे.
लागलीच शेतकरी प्रकाश धोंड्या यानी वनखात्याला घटनेची माहिती दिली.परंतु वनखात्याकडुन उलट प्रश्न केला की तुमचं घर काय पाडलेलं नाही ना काय खातात ते खाऊन दे असे उत्तर द्यायला लागले. म्हणून वनखात्याला कळून सुद्धा काही उपयोग होत नाही. त्यामुळे लोकांमधुन भीतीच वातावरण पसरलेले आहे.
देगाव येथील आनंद गावडे यांच्या शिवा रात हत्तीनी बरेच नुकसान केलेले आहे. नुकसान भरपूर झालेले असुन सुध्दा वनखात्याला घचनेचे माहिती देऊन चाची दखल घेत नाही. मग कुणाला कळवायचे असा प्रश्न आम्हा देगावकरांना पडलेला आहे .
कमीत कमी आनंद गावडे यांचे ५० हजार रूपयाचे नुकसान झालेले आहे. या हत्तीच्या भितीमुळे तालुक्याच्या ठिकाणी खानापूरला येणे सुध्दा कठीण झाले आहे. तेव्हा वनखात्याने हत्तीचा बंदोबस्त करावा, नाहीतर लोक रस्त्यावर उतरतील. असा इशारा आनंद गावडे यांनी व्यक्त केलेला आहे.
देगाव बरोबरच इतर पाच गावात हत्तीकडुन मोठ्याप्रमाणात नुकसान होत आहे.कान्हा खानापूरचे एसीएफ बसवराज वाळद व आरएफओ यानी लक्ष देऊन हत्तीचा बंदोबस्त करावा.अशी मागणी याभागातील नागरीकानी केली आहे.

