#बलराम चव्हाण याची पत्रकार परिषदेत माहिती!
खानापूर प्रतिनिधी
सध्या सुरू असलेल्या एस आय आर ( विशेष संक्षिप्त पुनरीक्षण) मोहिमे अंतर्गत भारत निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादीतील त्रुटी दुर करून, पात्र मतदाराची अचुक नोंदणी करण्यासाठी खानापूर तालुक्यात व्यापक मोहिम राबविण्यात येत असल्याची माहिती मतदान नोंदणी अधिकारी बलराम चव्हाण यानी खानापूर तहसील कार्यालयात बोलविलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना ते म्हणाले की बी एल ओ दि.३० जुन ते २९ जुलै पर्यत मतदारांच्या घरी भेट मतदारानी त्याना रंगीत फोटोसह आवश्यक कागदपत्रे तसेच माहिती द्यावी.यामध्ये जन्म दाखला,शाळा सोडल्याचा दाखला,जात प्रमाण पत्र,रहिवासी दाखला,ओळख पत्र प्यॅन कार्ड,व्होटीग कार्ड,आधार कार्ड, वाटप प्रमाण पत्र( जमीन,घर) आदी कागदपत्राची पुर्तता करा.
यासाठी खानापूर तालुक्यात एकूण ३१२ बी एल ओ प्रत्येक मतदान केंद्रास एक बी एल ओ नियुक्ती केली आहे. प्रत्येक बी एल ओ घरोघरी जाऊन मतदार ओळखपत्र,मतदार यादीतील नाव, पत्ता,आवश्यक कागदपत्राची पडताळणी करणार आहेत.
तेव्हा मतदार यादीतील त्रुटी दुर करून पात्र मतदाराना अचुक नोंदणी करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
तेव्हा तालुक्यातील नागरीकानी बी एल ओ अधिकार्यानाअचुक माहिती,कागदपत्रे
देऊन सहकार्य करावे.असे आवाहन मतदान नोंदणी अधिकारी बलराम चव्हाण यानी केले आहे.
