#शहरवासीसाठी मराठी हायस्कूलची मागणी पूर्ण,आता विद्यार्थ्याना पाठवा!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील सरकारी कन्नड हाय
स्कूलमध्ये मराठी माध्यमचे हायस्कूल व्हावे
यासाठी गेल्या कित्येक वर्षापासुन मागणी होत होती.ही मागणी सन २०२६-२७ सालच्या शैक्षणिक वर्षात बीईओ पी रामाप्पा यांच्या तयारी नुसार सुरूवात झाली.
शहरातील मराठी भाषिकातुन समाधान पसरले खरे मात्र आता आठवीच्या वर्गासाठी विद्यार्थी पाठवुन देण्याकडे पालक पाठ फिरवत आहेत.हाच मराठी माणसाचा वाईट गुण आहे. नेते मंडळी मराठी शाळा वाचविण्याची गरळ ओकतात आणि आपली मुले इंग्रजी शाळाना पाठवितात.असे अनेकजन आहेत.
सध्या खानापूर शहरातील सरकारी मराठी माध्यम च्या हायस्कूलसाठी विद्यार्थ्याचे आवश्यकता आहे.मात्र खानापूर च्या मराठी नागरीकानी आपली मुले दहा हजार रूपये खर्च करून शहरातील खासगी संस्थेच्या शाळेत पाठ वि ली आहेत.
त्यामुळे सध्या सरकारी मराठी माध्यम च्या हायस्कूल मध्ये विद्यार्थ्याची संख्या मोजकीच आहे.
सरकारी हायस्कूलमध्ये कोणतेच डोनेशन नाही,बिल्डिंग फंड नाही.एवढेच नव्हे मोफत गणेवेष, पाठ्यपुस्तक, मिरीटवर निवड झालेल्या शिक्षकाची नेमणुक असते.तरीसुध्दा सरकारी हायस्कूलमध्ये विद्यार्थ्याना पाठवुन देण्याकडे खानापूर शहरातील पालकांचा काय आडचण आहे.
जर खानापूर शहरात सरकारी मराठी माध्यम हायस्कूल चांगल्या पध्दतीने चालायचे असेल,मराठी शाळा टिकवायची असेल तर मराठी भाषिक नेत्यानी, पालकानी व जन ते ने लक्ष देणे गरजेचे आहे.

