शेतकर्याचे निवेदन
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील शेतकर्याना यंदाच्या
पेरणीसाठी बियाणे आणि खतांचा सुरळीत पुरवठा करा खत आणि बियांनाचा काळा बाजार बंद पाडा कृषी सहायक निर्देशक आणि कृषी निर्देशकांना तपासणी करायला लावा.
ऐन पेरणी हंगामात बी बियाणांच तुटवडा आणि युरिया सारख्या खतांचा काळा बाजार जोरात चालू झाला आहे शेतकऱ्याला योग्य दरात खत उपलब्ध होत नाही झालेत काही ठिकाणी खते जास्त रक्कम घेऊन विकली जात आहेत या सगळ्यांवर वचक ठेवण्यासाठी कृषी अधिकारीवर्गानी इन्स्पेक्शन करायला लावा आणि काळा बाजार करणाऱ्यांचा बंदोबस्त करा अशा आशयाचे निवेदन शेतकरी नेते प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव कृषी अधिकार्याना देण्यात आले,शेतकऱ्यावर होणार अन्याय आपल्याला माहीत आहे आणि आपण बी बियानाच्या पुरवठ्यासाठी त्याचबरोबर खताचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी खतांचा काळा बाजार बंद पडण्यासाठी कृषी खात्याच्या निर्देशक आणि सहायक निर्देशक यांना तपासणी करायला लावणार असल्याचे त्याचबरोबर कोण सापडलं तर कडक कारवाई केली जाईल असे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले.यावेळी शेतकरी नेते प्रसाद पाटील,माजी जिल्हा पंचायत सदश रमेश गोरल,माजी तालुका पंचायत सदश मारुती लोकूर, राजेंद्र पाटील,सुरेश जाधव,किरण लोंढे, परशराम जाधव,संतोष पाटील,पुंडलिक मेलगे, संगप्पा कुंभार,संजय सिद्धानी, नागापा कुंभार,सातेरी धामणेकर,सुभाष कुंभार,सुमित मेलगे, परशराम कोलकार आणि २५० पेक्षा जास्त शेतकरी उपस्थित होते..


