#खानापूर म ए समितीचे हेस्काॅम खात्याला निवेदन!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यात सातत्याने वीज पुरवठा खंडीत होत असल्याने शेतकर्याच्या पिकांचे व विद्यार्थ्याच्या अभ्यासाचे नुकसान होत आहे.त्यामुळे अनेक समस्याना तोंड द्यावे लागत आहे.
यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने नुकताच हेस्काॅम कार्यालय मोर्चा काढुन हेस्काॅम खात्याच्या अधिकार्याना निवेदन सादर केले.
यावेळी हेस्काॅम खात्याचे विभागीय अधिकारी नागेश देवलतकर यानी निवेदनाचा स्विकार केला.
निवेदनात म्हटले आहे. की, खानापूर तालुक्याच्या काही खेडेगावात फक्त रात्रीच्यावेळीच वीज पुरवठा केला जात असल्याने रात्रीच्यावेळी शेतकर्याना जंगलभागातील शेतात जाऊन जीव धोक्यात घालुन पिकाना पाणी द्यावे लागत आहे.त्यामुळे शेतकर्यातुन भितीचे वातावरण पसरले आहे. शिवाय शेतकरीवर्गातुन नाराजी पसरली आहे.
त्याच बरोबर वारंवार होणार्या खंडीत वीजपूरवठ्याने विद्यार्थ्याच्या अभ्यासावर ही गंभीर परिणाम होत आहे. ऐन परीक्षेच्या काळात खंडित विजपुरवठ्याने विद्यार्थ्याना मोठ्या समस्याना सामोरे जावे लागले.असे निवेदनात म्हटले आहे.
तालुक्यातील शेतकर्याची व विद्यार्थ्याची आडचण लक्षात घेऊन येत्या दोन दिवसात वीज पुरवठा सुरळीत केला नाही तर हेस्काॅम कार्यालयावर मोर्चा काढुन रास्ता रोको चा ईशारा दिला आहे.
निवेदन देताना खानापूर म.ए.समितीचे अध्यक्ष गोपाळराव बळवंत देसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी , माजी आमदार दिगंबर पाटील राजाराम देसाई समितीचे सदस्य प्रकाश चव्हाण, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील,युवा समिती अध्यक्ष धनंजय पाटील,अजित पाटील,जयसिंगराव पाटील,प्रकाश पाटील, शिवाजी पाटील, कृष्णा मंन्नोळकर,अमृत शेलार, एस.एच. गुरव, पुंडलिक पाटील, नागेश भोसले,संदेश कोडचवाडकर, गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत,रमेश धबाले, व्ही. व्ही.पाटील सहसचिव रणजित पाटील

