#दुसर्या क्रमांकाच्या कुस्तीत पै.पृथ्वीराजने बॅकथ्रोवर रशियन जलाल ला दाखविले अस्मान!
संदेश क्रांती न्यूज:
सुहास पाटील
खानापूर कुस्तीगीर संघटनेच्या वतीने रविवारी खानापूरातील मलप्रभा क्रिडांगणावर आयोजित आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाची कुस्ती अंतरराष्ट्रीय पै.मिरजा इरान व हिंदकेशरी पै.पुष्पेंदर हरियाणा यांच्यात कुस्तीगीर संघटना व आजी माजी आमदार यांच्यावतीने लावण्यात आली.
सुरूवातीपासुन एकमेकाच्या ताकदीचा अंदाज घेत १३० किलोवजनी पै.मिरजा इरानने पै.पुष्पेंदरच्या पायाला आकडी लावत काही वेळातच आकडी डावावर
पै.मिरजाने पै.पुष्पेंदरला चितपट करत कुस्ती शौकीनांची मने जिंकली.
तर दुसर्या क्रमांकाची कुस्ती अंतरराष्ट्रीय पै.जलाल रशिया विरूद्ध महाराष्ट्र केसरी पै.पृथ्वी राज पाटील यांच्यात उपस्थित पाहुणे अर्बनबॅक चेअरमन अमृत शेलार डाॅ.नाडगौडा, अँड,घाडी,डी एम भोसले आदीच्या हस्ते लावण्यात आली.
पै.,पृथ्वीराजने पै.जलाल रशियाला २०व्या मिनटाला बॅकथ्रोवर अस्मान दाखवत विजय मिळविला.
तिसर्या क्रमांकाची कुस्ती पै.विक्रम घोरपडे विरूद्ध रेत राज ठाकुर मथुरा यांच्यात होऊन पै.विक्रम घोरपडेने घुटना डावावर विजय मिळविला.चौथे या क्रमांकाची कुस्ती पै.कामेश पाटील विरूद्ध उमेश चव्हाण यांच्यात होऊन पै.उमेश चव्हाणने डंकी डावावर विजय मिळविला.
पाचव्या क्रमांकाची कुस्ती पै.गौतम शिंदे विरूद्ध पै शिवा दड्डी यांच्यात होऊन पै.गौतम शिंदेला विजय घोषित केले.
विजयी मल्ल पुढील प्रमाणे: पै.प्रेम जाधव क्ंग्राळी, पै.विक्रम शिनोळी,पै.पवन चिकदिनकोप,पै.प्रथमेश हट्टीकर,पै.विनायक येळ्ळूर,पै.पंकज चापगांव, पै.निखील कंग्राळी,पै.महेश बीरजे तिर्थकुंडे,पै.राजू डागेकर शिनोळी,पै.भूमी पूत्र मुतगा,पै.रोहन कडोली,पै.धृव मणिकेरी,पै.प्रवीन इटगी,पै.कुबेर पिरणवाडी,पै.आर्यन मुतगा,पै.जोतिबा चापगाव,पै.शंकर तिर्थकुंडे,पै.समर्थ किणये,पै.अब्बास बिजगर्णी, आदी अनेक पैलवान विजयी झाले.
,# मेंढा कुस्ती ! सदानंद होसुरकर याच्याकडुन
मेंढा कुस्ती पै.प्रथमेश हट्टीकर विरूद्ध पै.पृथ्वीराज खरात यांच्यात होऊन पै.प्रथमेश हट्टीकरने घिस्सा डावावर पै.पृथ्वीराजला अस्मान दाखविले.
महिला कुस्तीचे आकर्षण!
महिला कुस्तीत मोदेकोपची पै.भक्ती विरूद्ध खादरवाडीची पै.शितल सुतार यांच्यात होऊन मोदेकोपच्या पै भक्ति ने लपेट डावावर विजय मिळविला.तर पै.तनुजा खानापूर विरूद्ध पै.शिवानी वड्डेबैल ही कुस्ती बरोबरीत सुटली.
यावेळी पंच म्हणून पांडुरंग पाटील, डी.एम भोसले,लक्ष्मण बामणे,जयवंत खानापूरकर,अर्जुन देसाई, कल्लापा पाटील ,मधू पाटील,रोहित पाटील,सुरेश पाटील,प्रशात पाटील, मनोज बीरजे, बाळासाहेब सुतार आदीनी काम पाहिले.
यावेळी कुस्तीगीर संघटनेच्या माजी अध्यक्षाचा आजी माजी आमदारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तसेच मा जी आमदार गुरूवर्य परशुराम नंदीहळ्ळी ,हिंदकेसरी पै.सचिन शिरगुप्पी आदीचा सत्कर करण्यात आला.आखाड्याचे समालोचक कृष्णा चौगुले,प्रकाश मज गा वी यानी केले.
आखाडा यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष हणमंत गुरव, सेक्रेटरी सदानंद होसुरकर ,प्रकाश मजरा वी, यशवंत आल्लोळकर,रूद्रापा हिंडोरी,राजाराम गुरव,लक्ष्मण झांजरे,लक्ष्णण बामणे,पांडुरंग पाटील,अर्जुन जांबोटी,जयवंत खानापूरकर,अर्जुन देसाई,भाऊराव पाटील,अमोल बेळगाव कर व इतर सदस्यानी मेहनत घेतली.
कुस्त्या पाहण्यासाठी कुस्तीशौकीनानी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती.

