#मुख्याध्यापक पदी बढती”
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
गर्लगुंजी ( ता.खानापूर) गावचे सुपूत्र व झाड नावगा सरकारी पूर्व प्राथमिक मराठी शाळेचे शिक्षक पी डी कुंभार यांची नुकताच झालेल्या बढती प्रक्रियेमध्ये निडगल ( ता.खानापूर ) येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या मुख्याध्यापक पदी बढती झाली.
या निमित्त नुकताच पी .डी.कंभार यानी निडगल शाळेत येऊन पदभार स्विकारला.मुख्याध्यापक पदी हजर झाल्यानिमित्त निडगल शाळेच्या शिक्षकवर्गाने व शाळा सुधारणा कमिटीच्यावतीने स्वागत समारंभ पार पडला.
यावेळी निडगल शाळेच्या सहशिक्षिका सौ.ज्योती बाबूराव जांगळे , सहशिक्षक सुब्राव राजाराम पाटील यानी नुतन मुख्याध्यापक पी.डी.कुंभार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष विनायक यं.कदम ,सदस्य दिगंबर देसाई अशोक कदम तसेच बरंगाव सीआरपी फारूक मुल्ला, तसेच एस डी पाटील ,सुदेश मेलगे आदी शिक्षकवर्ग उपस्थित होते.
नूतन मुख्याध्यापक पी डी कुंभार यांची ११आँगष्ट १९ ९४ रोजी शिक्षक सेवेची सुरूवात झाली. पहिली शाळा पूर्व प्राथमिक मराठी शाळा हब्बनहट्टी शाळेत ९ वर्षे शिक्षकीसेवा बजावली, तेथून त्यांची बदली प्राथमिक मराठी शाळा झाडनावगे येथे झाली.याशाळेत २३ वर्षे सेवा बजावली.तेथून त्याची मुख्याध्यापक पदी बडती निडगल. येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेत झाली.दि.८ मे २०२६ रोजी त्यांनी मुख्याध्यापक पदाचा पदभार स्विकारला.


