संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
सुरापूर (ता.खानापूर) गावच्या ग्राम देवता दुर्गादेवीच्या यात्रोत्सवाला शुक्रवारी दि.१५ रोजी सकाळी ७ वाजता विविध धार्मिक विधीसह मोठ्या उत्साहित प्रारंभ झाला.
प्रारंभी नव ग्रह पूजन , रूद्राभिषेक, होमहवन, यज्ञ, आदि धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्ती भावाने पार पडले.
वेद मूर्ती चिंदानंदय्या हिरेमठ तसेच निच्चणकी येथील वेदमुर्ती, शशिकांतय्या महास्वामी यांच्या दिव्य सान्निध्यात व त्यांच्या हस्ते विधी संपन्न झाले.
यावेळी महाप्रसादाचा कार्यक्रम झाला.त्यानंतर दुर्गादेवीची भव्य पल्लखी मिरवणुक काढण्यात आली.पालकी सोहळ्यात शेकडो भाविकांनी भंडारा उधळत जल्लोष साजरा केला.हजारो भाविकानी उपस्थित राहुन सोहळ्याची शोभा वाढविली.
संपूर्ण सुरापूर गावात आंब्याची तोरणे, केळीची झाडे.केशरी ध्वज,केसरी पताका,रांगोळी व विधुत रोषणाईने आकर्षक सजावट करण्यात आली होती.
यावेळी दुर्गा देवी, मंदिराचे चेअरमन सुदीप गवे,सचिव कार्तिक ओटे,सचिन गस्ती,गोपाल गस्ती,दशरथ गुरन्नावर,रवी गुगे,भयाजी गवे,सतीश ओटे,अनिल गुरून्नावर,अजीज गिरीयाल,अश्रफ हो सुर आदी उपस्थित होते.


