#नागुर्डावाड्यात मंदिराचा उदघाटन सोहळा!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
बेळगाव सीमाभागात माझ्या वडिलानी जे नात जपलं तेच नात मी महाराष्ट्राचा आमदार या नात्याने जपेण, सीमाभागातील समस्या जवळून पाहिल्या आहेत.याची खंत मला आहे.
सीमाभागातील आणि माझ्या भागातील रितीरिवाज या एकमेकाला जुळणार्या आहेत. आज नागुर्डावाड्यात मंदिर तेथे वाचनालय हा उपक्रम मला खूपच आवडला.मी आमदार या नात्याने माझ्या मतदार संघात जिथ मंदिर उभारू तिथ वाचनालय उभारीन, असे मत महाराष्ट्राचे तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघाचे आमदार रोहित आर.आर.आबा पाटील यानी शुक्रवारी दि.१५ मे रोजी नागुर्डावाडा येथे श्री नागेश महारूद्र मंदिराच्याउदघाटन प्रसंग बोलताना व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री नागेश महारूद्र मंदिर कमिटीचे अध्यक्ष निरंजनसिंह उदयसिंह सरदेसाई होते.
व्यासपिठावर आमदार विठ्ठलराव हलगेकर,माजी आमदार, दिगंबर पाटील, अरविंद पाटील, मध्यवर्ती म ए समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे,श्रीराम सेना अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, मध्यवर्ती सरचिटणीस मालोजी आष्टेकर, खानापूर म ए समिती अध्यक्ष गोपाळ देसाई,समितीनेते आर एम चौगुले,अध्यक्ष युवा समिती अंकुश केसरकर,प्रतापसिंह सरदेसाई, खानापूर ब्लाॅक काॅगेस अध्यक्ष अँड,ईश्वर घाडी, समिती सरचिटणीस आबासाहेब दळवी, भाजप राज्य कार्यकरणी सदस्य प्रमोद कोचेरी,माजी जि.प. सदस्य जयराम देसाई,युवा नेता पंडित ओगले,समिती नेते बाळासाहेब शेलार,रमेश धबाले,गोपाळ पाटील , प्रकाश चव्हाण,माजी ता.प.सदस्य पांडूरंग सावंत,माजी ग्रा पं सदस्य प्रसाद पाटील, अर्बन बॅक चेअरमन अमृत शेलार,सामाजिक कार्यकर्ते विनायक मुतगेकर,आदी मान्य वर उपस्थित होते.
प्रारंभी मंदिराच्या प्रवेशव्दाराचे उदघाटन आमदार रोहित आर.आर.आबादी पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. तर मंदिराच्या गाभाऱ्याचे उद्घाटन आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच मंदिर तेथे वाचनालय या उपक्रमाचे उदघाटन सरचिटणीस मालोजी आष्टेकर यांच्याहस्ते करण्यात आले.तर उपस्थित मान्यवरांच्याहस्ते दीप प्रज्वलन व विविध फोटोचे पुजन करण्यात आले.
यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर बोलताना म्हणाले की, ग्रामदैवताच्या मंदिराचा जीर्णोद्धार ही गावाची सांस्कृतिक आणि धार्मिक एकात्मता वाढवणारी भावना असल्याचे सांगीतले,
यावेळी उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली.
या सोहळ्याला परिसरातील अनेक मान्यवर, राजकीय नेते मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. तसेच नागुर्डा, नागुर्डावाडी व विश्रांतवाडी परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते
प्रस्ताविक व उपस्थितांचे स्वागत ज्ञानेश्वर पाटील यानी केले. कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने झाली.


