संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
महसूल विभागाने खानापूर तालुक्यातील २१,००० हून अधिक पेंशन्स स्थगित केल्या आहेत. यामुळे वृद्ध, दिव्यांग आणि विधवांना प्रचंड हाल अपेष्टांना सामोरे जावे लागत आहे; कारण त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधनच थांबले आहे. ही समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी आपण योग्य ती कार्यवाही करावी, अशी तहसीलदार यांच्याकडे निवेदन माध्यमातून विनंती केली आहे, कृपया सर्व तलाठी (गाव लेखापाल), महसूल निरीक्षक आणि नायब तहसीलदार यांना योग्य सर्वेक्षण करण्याबाबत निर्देश द्यावेत, जेणेकरून कोणाचीही गैरसोय होणार नाही दिव्यांग आणि वृद्ध व्यक्तींकडे उत्पन्नाचे अन्य कोणतेही साधन नसते; अगदी विधवांच्या बाबतीतही आपण मदतीचा हात देणे अत्यावश्यक आहे. वेतन लवकरात लवकर सुरू करण्यासाठी कृपया आवश्यक ती पावले उचलावीत. आपण या संदर्भात योग्य ती कार्यवाही कराल, अशी आम्हाला आशा आहे.
असे गर्लगुंजी ग्राम पंचायत माजी सदस्य प्रसाद पाटील यांनी तहसीलदार आणि तालुका दंडाधिकारी दुंडप्पा कोमार यांना निवेदनाव्दारे विनंती केली. यावेळी आपण योग्य सर्वेक्षण करून अहवाल सादर करतो आणि पेन्शन लवकरात लवकर पुन्हा सुरू करन्यासाठी प्रयत्न करतो कुणावरही अन्याय होणार नाही यासाठी योग्य पाऊले उचलली जातील असा विश्वास तहसीलदार खानापूर यांनी दिला .
त्याचवेळी हेस्कॉम खानापूर यांनाही समज द्यावी आणि वीज व्यवस्था सुरळीत करावी विजेचा खेळ खंडोबा बंद व्हावा यासाठी हेस्कॉम विभागाने तालुक्यातील रिपेअर,फांद्या कटिंग आणि आणि इतर काम पूर्ण करावी,तशीलदारानी हेस्कॉम विभागाला समज द्यावी, वीज व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करावे अशीही मागणी करण्यात आली
यावेळी माजी ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील,प्रमोद सुतार, परशराम बेळगावकर,रामचंद्र लोहार, मर्याप्पा पाटील उपस्थित होते.


