#पावसाळ्या आदी पॅचवर्क करण्याची गरज!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील इदलहोंड अंकले रस्त्याचे डांबरीकरण करूण काही वर्षात रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत.
येत्या पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचे पॅचवर्क करून रास्ता वाहतुकीस सुरळीत करावा.अशी मागणी याभागातील वाहनधारकातुन होत आहे.
इदलहोंड अंकले या ३ ते ४किलो मीटर अंतराच्या रस्त्याचे डांबरीकरण करून काही काळातच यारस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजविले नाहीतर दिवसेदिवस खड्डे वाढत जाणार त्यामुळे बघता बघता रस्त्याची दुर्दशा होणार आहे. त्यामुळे या रस्त्यावर पॅचवर्क होने गरजेचे आहे .
तेव्हा या रस्त्याच्या कंत्राटदाराने या रस्त्याची पाहणी करून पंच वर्क कराने गरजेचे आहे. तसेच इदलहोंड ग्राम पंचायतीने या रस्त्याच्या दुरूस्ती कडे लक्ष देऊन रस्त्याची डागडुजी ठेवावी.
इदलहोंड अंकले रस्त्यावर वाढती वर्दळ!
खानापूर तालुक्यातील इदलहोंड अंकले यारस्त्यावर आवजड वाहनाची वर्दी वाली आहे.कारण गणेबैल टोलनाका झाल्यामुळे सर्हास अवजड वाहन धारक, चारचाकी वाहनधारक टोलनाका चुकविण्यासाठी इदलहोंड मार्गे अंकल्यावरून खानापूरला ये न्यास सोयीचे होते.त्यामुळे वाहतुक वाढली आहे.त्यातुनच या रस्त्याची दुर्दशा झाली आहे.

