#नंदगड येथील विरक्त मठात आयोजन!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
नंदगड ( ता. खानापूर ) येथील ऐतिहासिक १२ व्या शतकातील शरण परंपरा असलेल्या विरक्तमठाचे उत्तराधिकारी प.पू.श्री.चन्नवीरदेवरू यांच्या नेतृत्वाखाली वयाच्या १९ वर्षी सुमारे ६० हुन अधिक गावाना पदयात्रा ,भिक्षाठन व धार्मिक जागृती सभा रविवारी दि.३ मे रोजी सकाळी १० वा जता विरक्तमठ नंदगड ये थे आयोजित करण्यात आली आहे.
तरूण युवकानी व्यसनापासुन बाहेर पाडावे.यासाठी तालुक्याच्या ६० खेड्यातुन प्रवास करून व्यसनमुक्ती व्हावी.म्हणून प.पू.श्री.चन्नवीर देवरू यांच्यानेतृत्वाखाली धर्मजागृती सभेचे आयोजन केले आहे.
अशी माहिती आमदार विठ्ठल हलगेकर यानी शुक्रवारी दि.१ मे रोजी खानापूर येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विश्रामधामात बोलविलेल्या पत्रकार परिषेदत दिली.
यावेळी प्रास्ताविक माजी नगरसेवक आप्पया कोडोळी यानी केले.
भाजपचे राज्य कार्यकारणी सदस्य प्रमोद कोचेरी म्हणाले की, पूज्य श्री. चन्नविरदेवरू यानी जवळ पास ६० खेड्यातुन प्रवास करून समाजामध्ये चांगले संस्कार नसल्याने आजची युवा पिढी व्यसनादीन होत आहे.यासाठी स्वामीनी घेतलेले कार्य खूप मोठे.यासाठी सर्व पक्षीय ने त् यानी उपस्थित राहुन सहकार्य करू असे सांगीतले.
यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष संजय कुबल म्हणाले की नंदगड विरक्तमठाचे उत्तराधिकारी पुज्य श्री चन्नवीरदेवरू यानी वयाच्या १९ व्यावर्षी ६० हुन अधिक खेड्यात पद यात्रा काढुन तरूण मंडळीना व्यसनापासुन दुर राहण्यासाठी जागृति करत आहेत.या कार्यक्रमाला सर्व पक्षीय नेता मंडळीनी हा कार्यक्रम यशस्वी करू असे सांगीतले.
यावेळी भाजप युवा नेता पंडित ओगले, आपय्या कोडोळी यानी आपले विचार व्यक्त केले.
यावेळी बोलताना नंदगड विरक्तमठाचे उत्तराधिकारी पुज्य श्री चन्नवीरदेवरू म्हणाले की या पद यात्रा व बृहत धर्म जागृती सहेली अध्यक्ष म्हणून आमदार विठ्ठल हलगेकर असुन २० स्वामीजी उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाला विषेश उपस्थिती म्हणून बसनगौडा पाटील यत्नाळ राहणार आहे.तर पालकमंत्री सतीश जारकिहोळी,मंत्री लक्ष्मी हेबाळकर,खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी,एम एल सी लखन जारकिहोळी,चन्नराज हट्टीहोळी, महांतेश कवटगीमठ,आमदार हनुमंत निराणी,महातेश कौजलगी, बाबासाहेब पाटील तसेच माजी आमदार व नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत.तेव्हा सर्वानी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
यावेळी सेक्रेटरी गुंडू तोपिनकट्टी यानी आभार मानले.
