संदेश क्रांती न्यूज
खानापूर प्रतिनिधी
उचवडे ( ता. खानापूर )येथील पहिले युवक सैन्यात भरती होऊन प्रशिक्षण पूर्ण करूण सुट्टीवर आलेल्या विशाल रघुनाथ पाटील,व अनिल आदिनाथ बोंझेर्डेकर या जवानाचा सत्कार सोहळा महात्मा फुले सार्वजनिक वाचनालय तर्फे नुकताच करण्यात आला.
हा कार्यक्रम उचवडे प्राथमिक मराठी शाळेच्या आवारात पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उचवडे गावचे नागरीक माजी जिल्हा पंचायत सदस्य लक्ष्मण बामणे उपस्थित होते.
प्रारंभी महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष शिवाजी हसनेकर यानी प्रास्ताविक केले.व उपस्थिताचे स्वागत केले.
यावेळी जवान विशाल पाटील यांचा सत्कार माजी जिल्हा पंचायत सदस्य लक्ष्मण बामणे यांच्या हस्ते व जवान अनिल बोंझेर्डेकर यांच्याहस्ते यांचा सत्कार हभप धोडिंबा बोंझेर्डेकर यांच्याहस्ते शाल, श्रीफळ, व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यानिमित्त ज्यानी या जवानाना घडविले.त्या त्यांच्या आंजोबाचा ही या निमित्त सत्कार करण्यात आला.त्याच बरोबर बाबूराव लक्ष्मण पाटील यांचा सत्कार वाचनालयाचे अध्यक्ष शिवाजी हसनेकर यांच्या हस्ते तर. हणमंत बोंझेर्डकर यांचा सत्कार वाचनालयाचे उपाध्याक्ष हभप दशरथ पाटील यांच्याहस्ते
शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.
यावेळी ग्राम पंचायतीचे माजी सदस्य शाहु पाटील, यानी यावेळी विचार मांडले, तर जवान विशाल पाटील , व अनिल बोंझेर्डेकर यानी सत्त्काराला उत्तर देताना आपले मनोगत व्यक्त केले.शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जिल्हा पंचायत सदस्य लक्ष्मण बामणे यांच्या अध्यक्षिय भाषणाने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.महादेव खोत यानी केले .तर आभार कल्लापा पाटील यानी मानले.
