संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक सीएम त्यागराज यांनी खानापूर येथील मराठा मंडळ कला आणि वाणिज्य महाविद्यालयात सदिच्छा भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कुलगुरू प्रा. त्यागराज विद्यार्थ्यांना उद्देशून बोलताना म्हणाले की, “केवळ उच्च पदवीधर असून चालत नाही तर अंगी कौशल्य गुण असायला हवेत त्या बळावर आपण वेगवेगळ्या क्षेत्रात भरारी घेऊ शकतो. शिक्षणासोबतच व्यक्तिमत्व विकासाची गरज आहे. आपण आपल्या परिसराचे घराचे लौकिक करावयाचे झाल्यास आदी गाव घर सोडले पाहिजे. तरच तुमचे भविष्य घडू शकेल. वेगवेगळ्या संधी कौशल्य विकसित झालेल्या विद्यार्थ्यांसाठी दार ठोठावत आहेत.” असे उद्गार त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून काढले. उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. जयश्री अंची यांनी केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राणी चन्नम्मा विद्यापीठाचे सिंडिकेट सदस्य श्री. रफी भंडारी, देशपांडे फाउंडेशनचे सदस्य श्री रहमान, श्री. किरण मिरजी, डॉ. विजयालक्ष्मी तीर्लापूर, डॉ. राजश्री तीरवीर आदी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रणाली सावंत यांनी केले तर आभार राष्ट्रीय मूल्यांकन समितीचे महाविद्यालयीन प्रतिनिधी प्रा. कपिल गुरव यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग विद्यार्थी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.
