#खानापूरात भाजपच्या महिलाची मोठ्या संख्येने उपस्थिती!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरात सोमवारी दि.२७ रोजी खानापूर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने काँग्रेसच्या महिला विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी भव्य निषेध फेरी काढण्यात आली.
ही फेरी सौ. सुनीता पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सायंकाळी ५ वाजता मोठ्या उत्साहात पार पडली.
यावेळी नारी शक्ती सन्मान विधेयकाला” विरोध करून काँग्रेस पक्षाने महिलांच्या हक्कांवर गदा आणली असून ३३% आरक्षण हिरावून घेत संपूर्ण महिला वर्गाचा अपमान केला आहे. असा आरोप भाजप महिला नेत्या सौ. धनश्री सरदेसाई, सौ. सुनीता संतोष पाटील व सौ. प्रवीणा फटाण यांनी आपल्या भाषणातून केला.
या विधेयकामुळे लोकसभेत सुमारे १७० महिला खासदार व राज्यात ७० पेक्षा अधिक महिला आमदार निवडून येऊ शकल्या असत्या, ज्यामुळे महिलांच्या प्रश्नांना योग्य व्यासपीठ मिळाले असते. मात्र कोणतेही ठोस कारण न देता काँग्रेस व इतर विरोधी पक्षांनी या ऐतिहासिक विधेयकाला विरोध केल्याचा आरोप करण्यात आला.
या मोर्चाला भाजपा राज्य समिती सदस्य प्रमोद कोचेरी, जिल्हा कमिटी सदस्य संजय कुबल, तालुका उपाध्यक्ष अँड. चेतन अरुण मणेरीकर, जिल्हा युवा मोर्चा नेते पंडित प्रकाश ओगले, प्रधान कार्यदर्शी गुंडू तोपीनकट्टी, मोहन पाटील, नगरसेवक अप्पया कोडोळी, तसेच खानापूर तालुक्यातील विविध गावांतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
प्रारंभी मोर्चाची सुरुवात शिवस्मारक सर्कल येथून होऊन स्टेशन रोड, पारिश्वाड क्रॉस मार्गे बसवेश्वर सर्कलपर्यंत झाली . तर मोर्चाची सांगता बेळगाव पणजी रोडवरील डॉ. आंबेडकर गार्डन येथे करण्यात आली.
यावेळी महिलांच्या हक्कांसाठी लढा कायम राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
