#गुणवंत विद्यार्थ्याना फीत सवलत,एस एन क्यू कोट्यातुन संधी!
पत्रकार परीषदेत दिली माहिती
संदेश क्रांती न्यूज
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील विद्यार्थ्याना दर्जेदार तांत्रिक शिक्षण मिळावे.या हेतुने लोकमान्य एज्यूकेशन सोसायटीच्यावतीने खानापूर शहरातील लोकमान्य भवन येथे माजी आमदार व्ही.वाय.चव्हाण पाॅलिटेक्निक काॅलेजला सुरूवात झाली.यंदाच्या शैक्षणिकवर्षाच्या प्रवेशाला प्रारंभ होत आहे.तेव्हा इच्छुक विद्यार्थ्यानी याचा लाभ घ्यावा.प्राचार्य डाॅ.शिरीष केरूर यानी शनिवारी दि.२५ रोजी खानापूर येथील माजी आम.व्ही.वाय.चव्हाण पाॅलिटेक्निक काॅलेजमध्ये बोलविलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.
यावेळी ते म्हणाले की, आमच्या संस्थेचे प्रमुख डाॅ.किरण ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षीपासुन प्रारंभ झालेल्या या काॅलेजला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.खानापूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना बाहेर जाऊन तांत्रिक शिक्षण देने कठीण होते.यासाठी तांत्रिक शिक्षणाची सोय व्हावी.हा उद्देश डाॅ.किरण ठाकूर असल्याचे सांगीतले.यावेळी पत्रकार परिषदेला खजिनदार डाॅ.डी.एन.मिसाळे,सेक्रेटरी सत्यव्रत व्ही.नाईक डायरेक्टर प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते.
खानापूर माजी आम.व्ही.वाय.चव्हाण पाॅलिटेक्निक काॅलेजात चार प्रमुख डिप्लोमा कोर्सची सोय करण्यात आली आहे.यामध्ये काॅम्प्यूटर लायन्स,इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन , आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग व इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इत्यादी कोर्स आहेत.
प्रत्येक कोर्सला ६० विद्यार्थ्याना प्रवेश दिला जाणार आहे.प्रत्येक शाखेतुन ३ विद्यार्थ्याना
एस एन क्यू कोट्यातुन प्रवेश देण्यात ये मार आहे.१० वी पास विद्यार्थी,१२ वी पास विद्यार्थी अथवा नापास तसेच आयटीआय, जीओसी, विद्यार्थ्याना प्रवेश देण्यात येणार
आहे.तसेच जे विद्यार्थी आर्थिक दृष्ट्या गरीब आहेत.अशा विद्यार्थ्याना परिस्थितीनुसार फी मध्ये सवलत देणार आहेत.
यावेळी सेक्रेट्ररी सत्यव्रत नाईक म्हणाले की, भविष्यात बी ई इंजीनियरिंग काँलेज सुरू करण्याचा विचार संस्थेचे प्रमुख डाँ. किरण ठाकूर यांचा आहे.असे सांगीतले.
तर संचालक प्रकाश चव्हाण म्हणाले की, खानापूर तालुका अति मागासलेला तालुका म्हणून ओळखला जातो.त्यात शैक्षणिक दृष्ट्या ही मागासलेला तालुक्यात तांत्रिक शिक्षणाची सोय करण्याचा उद्देश डाॅ.किरण ठाकुर यानी आमलांत आणला.आणि काॅलेजची सुरूवात केली.ही शिक्षणाची गंगा चालविण्यासाठी आम्ही सर्वानी मिळवून त्याच्या पाठीशी राहू असे सां गीत ले.
यावेळी डाँ.डी.एन मिसाळे म्हणाले की,विद्यार्थ्याना शिक्षणासाठी कर्जाची सोय करून देण्यात आली, तर फी भरण्यासाठी तीन टप्यात हप्त्यांची सोय करण्यात येणार आहे.विद्यार्थ्यासाठी हाॅस्टेलची सोय करण्यात येणार असल्याचे सांगीतले.
तेव्हा खानापूर तालुक्यातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी प्रवेश घ्यावा.असे आवाहन करण्यात आले.
