#खानापूर तालुक्याच्या सूनबाईने तालुक्याचे संशोधनातून फेडले ऋण.तालुक्यातील सूनबाईंना घालून दिला आदर्श !
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
सावरगाळी( ता. खानापूर )येथील सासर असलेल्या, माहेर गणेशपूर बेळगाव व निप्पाणी येथील सरकारी प्रथम दर्जा महाविद्यालयाच्या मराठीच्या प्राध्यापिका प्रा. सुनीता गं. राक्षे-गुरव यांनी “खानापूर तालुक्यातील लोककलांवर गोमंतकाचा प्रभाव : एक तुलनात्मक अभ्यास” या शीर्षकाअंतर्गत खानापूर तालुक्याच्या मराठी बहुल भागाच्या सीमारेषा, तालुक्याची संस्कृती, गोमंतकाशी असलेली नाळ, सण- उत्सव, आजच्या युगातही तग धरून राहिलेली तालुक्यातील लोकनृत्य, लोकनाट्य, लोककथा, पौराणिक नाटके, पारंपरिक खेळ, इथल्या भाषा, तालुक्याच्या विविध भागातील लोकगीते इत्यादींचे मागील सहा वर्षाच्या काळात लोकठेवा जपणार्या तालुक्यातील अनेक गावांना भेटी देऊन तिथल्या कलावंताच्या गाठीभेटी घेत लोककलांचे संकलन केले आहे. पुढे त्याची चिकित्सकपणे मांडणी करत धारवाड विद्यापीठास त्यांनी प्रबंध सादर केला होता. नुकताच झालेल्या दीक्षांत समारंभात कर्नाटक राज्याचे विद्यमान माननीय राज्यपाल थावरचंद गेहलोल, कर्नाटक विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एम. सी. सुधाकर व मान्यवरांचा हस्ते त्यांना डॉक्टरेट पदवी प्रधान करण्यात आली. याकामी मार्गदर्शक म्हणून डॉ. यशवंत राऊत यांचे मार्गदर्शन लाभले. शिवाय डॉ. अमृत यार्दी, डॉ. विनोद गायकवाड, डॉ. चंद्रकांत वाघमारे, डॉ. इराप्पा गुरव, डॉ. दुर्गेश माजिक यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. डॉ. पर्मेश्वर पाटील, सोलापूर येथील सोमेश्वर व बनसिद्धेश्वर मंदिराचे मठाधीश डॉ. शिलीसिद्ध स्वामीजी, डॉ. सुनंदा शिसोदे, तालुक्यातील मराठी संस्कृती प्रेमी मंडळी, शिक्षक महाविद्यालयीन विद्यार्थी यांचे त्यांना सहकार्य लाभले. या त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
