#गर्लगुंजी परिसरातुन अभिनंदन!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
गर्लगुंजी ( ता.खानापूर ) येथील विश्व भारत सेवा समिती संचालित ज्योतिराव फुले विद्यालयाचा सन २०२५-२६ सालचा इयता दहावीचा १०० टक्के लागला असुन परीक्षेला एकूण ३७ विद्यार्थी बसले होते.त्यापैकी सर्व विद्यार्थी पास होऊन हायस्कूलचा निकाल १०० टक्के लागला.
यामध्ये ४ विद्यार्थी विशेष श्रेणीत पास झाले.२६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत पास झाले, ५ विद्यार्थी व्दितीय श्रेणीत पास झाले.तर २ विद्यार्थी पास श्रेणीत पास डाले आहेत.
हायस्कूलमध्ये कुमारी लक्ष्मी वसंत पाटील हिने५६० मार्कासह ८९.६९ % गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकाविला.तर कुमारी लक्ष्मी पुंडलिक हुंदरे हिने ५५९ मार्कासह ८९.४४ % गुण घेऊन व्दितीय क्रमांक पटकाविला.
तर कुमारी सोनाली परशराम पाटील हिने ५५३ मार्कासह ८८.४४ % गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकाविला.
यशस्वि विद्यार्थ्याचे संस्थेचे अध्यक्ष विजयराव नंदीहळ्ळी यानी अभिनंदन केले आहे.
यशस्वी विद्यार्थीना मुख्याध्यापक के.एम.पाटील व सहशिक्षकाचे मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे.
गर्लगुंजीच्या ज्योतिराव फुले विद्यालयाचा पहिल्यांदाच दहावीचा १०० टक्के निकाल लागल्यामुळे गर्लगुंजी परिसरातुन अभिनंदन होत आहे.

