#शाझिया इनामदार ही ५९२गुण घेऊस्कूलमध्ये प्रथम!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील समर्थ इंग्लिश मीडियम स्कूलचा एप्रिल मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल 100% टक्के लागला असुन हायस्कूल मधुन शाझिया अहमदपाशा इनामदार हिने 592 गुणासह 94.72% टक्के मार्क घेऊन प्रथम क्रमांंक पटकाविला.
तर गौतमी गुरूबासप्पा सत्तीगीरी हिने 489 गुण ( 78.24 %), स्मिता राजू मादार हिने 483गुण( 77.28%), सागर शिवाजी गुरव याने 479 गुण ( 76.64%). तर सेनेगल परशराम पाटील हिने 454 गुण ( 72.64%) गुण मिळविले.
स्कूलचे चेअरमन एफ एम पाटील , सचिव डाॅ.डी.ई नाडगौडा व संचालक मंडळ तसेच मुख्याध्यापक, प्रशासकीय विभाग व सर्व कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
यशस्वि विद्यार्थ्यांनी दाखवलेली मेहनत, चिकाटी आणि समर्पण यांचे खानापूर तालुक्यातुन कौतुक होत आहे.


