#लोंढा पत्रकार कै.यल्लापा कानर यांची कन्या!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
लोंढा ( ता.खानापूर ) येथील कन्नड पत्रकार कै.यल्लापा कानर यांची कन्या व लोंढा हायस्कूलची विद्यार्थीनी कुमारी मुक्तेश्वरी यल्लापा कानर हिने मार्च २०२६ मध्ये पार पडलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत ५९९ मार्क व ९५ .८४ गुण घेऊन यश संपादन केले.
लोंढा एस एस एल सी सेंटर व लोंढा हायस्कूल मधुन प्रथम येण्याचा मान मिळविला.तर लोंढा हायस्कूल स्थापनेपासुन आज तागायत ९५.८४ टक्के गुण घेऊन प्रथम येण्याचा मान मुक्तेश्वरी यल्लाप्पा कानर हिने मिळविला.
तिच्या या बद्दल लोंढा हायस्कूलचे चेअरमन अशोक नेसरीकर, सचिव संतोष भुतकी व संचालक मंडळ,मुख्याध्यापक ,शिक्षक आदीनी तीचे अभिनंदन केले.व शुभेच्छा दिल्या.