#खानापूर तालुक्यातुन कौतुक!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
नागरगाळी ( ता. खानापूर ) ग्राम पंचायतीला कर्नाटक सरकारकडुन ग्रामीण विकास आणि पंचायत राज्य विभाग यांच्यावतीने सन २०२४-२५ सालासाठी देण्यात येणारा प्रतिष्ठेचा गांधी ग्राम पुरस्कार देऊन नुकताच जाहिर झाला आहे.
नागरगाळी ग्राम पंचायतीने मुलभुत सुविधा
स्वच्छता,उत्तम प्रशासन तसेच हरित ग्राम व्यवस्थापन याक्षेत्रात चांगली कामगीरी केल्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाआहे.
नागरगाळी ग्राम पंचायतीत ही ८ महसुली गावे, ५ मजरे यांचा समावेश आहे.ग्राम पंचायती च्या हद्दीत २,७०१ लोक संख्या असुन सन २०२४-२५ सालात शंभर टक्के कर वसुली करण्यात ग्राम पंचायत यशस्वी झाली आहे.ग्रामपंचायतीने गावात स्वच्छतेचा आदर्श केला असुन प्रत्येक गाव स्वच्छ व सुबक दिसत आहेत.
ग्रामपंचायतीने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जवळपास २० लाख रूपये खर्चून सुसज्ज सुसज्ज घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यात आला आहे.ग्राम पंचायतीच्या स्वत:च्या स्वच्छ वाहिनी व्दारे दररोज ओला व सुका कचरा संकलित करून त्याचे वर्गीकरण केले जाते.या स्वच्छ वाहिनी करीता महिला स्वयंसहाय्य संघामार्फत महिला चालकाची नियुक्ति करण्यात आली आहे.
ग्राम पंचायतीच्या क्षेत्रात असलेल्या १० अंगणवाड्यांना सुसज्ज व हाय टेक शौचालयांची सुविधा उपलब्धता करून देण्यात आली आहे.तसेच ग्राम पंचायती च्या स्वनिधीतुन सर्व अंगणवाड्या बालस्नेही पध्दतीने विकसित करण्यात आल्या आहेत.
ग्राम पंचायत कार्यक्षेत्रातील पूर्व प्राथमिक व उच्च प्राथमिक ११ शाळाना हायटेक शौचालयांची सुविधा देण्यात आली असुन प्रत्येक शाळेसाठी मनेरगा योजनातुन स्वयंपाकगृह बांधण्यात आली असुन प्रत्येक शाळेचे मैदान मनरेगा अंतर्गत बालस्नेही क्रीडागणात रूपांतरीत करण्यात आले आहे.
ग्राम पंचायतीत अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या नागरीकांच्या अंत्यसंस्कारासाठी स्वनिधीतुन प्रत्येकी ५ हजार रूपयाची मदत दिली जाते. सर्व कुटुंबाकडे स्वतंत्र शौचालये असुन त्यांचा योग्य वापर केला जातो.नागरिकासाठी तसेच मनरेगा कामगारासाठी वेळोवेळी मोफत आरोग्य शिबीरे आयोजित केली जातात.
त्याचबरोबर १५व्यावित्त आयोग आणि मनरेगा योजनार्तगत प्रत्येक गावात आकर्षक सी सी रोड तसेच सी सी गटारी बांधण्यात आली आहेत. ग्रामपंचायतीत एकूण ६६८ जाॅब कार्ड असुन सन २०२४-२५ मध्ये २१४७९मान दिवसांची निर्मिती करण्यात आली आहे.
एकूणच भारतीय संविधानाच्या ७३ व्या घटना दुरूस्तीमुळे ग्रामस्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार होत असल्याचे ग्रामपंचातीने आपल्या कार्यातुन सिध्द केले आहे.
कार्यतात्पर्य पीडीओ.बलराज बजंत्री!
नागरगाळी ग्राम पंचायतीचे पीडीओ.बलराज बजंत्री यानी आपल्या सेवेत उल्लेखनीय कामगीऱी बजावली आहे.
त्यानी या पूर्वी लोंढा ग्राम पंचायतीला गांधी ग्राम पुरस्कार मिळवुन दिला आहे.
तर आता नागरगाळी ग्राम पंचायतीला ही गांधी ग्राम पुरस्कार मिळाला आहे.
या पुरस्कारामागे ग्राम पंचायतअध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य तसेच कर्मचारी यांच्या सहकार्याने नागरगाळी ग्राम पंचायतील गांधी ग्राम पुरस्कार मिळाल्याचे त्यानी स्पष्ट केले आहे.त्यामुळे सर्वाचे मनपुर्वक आभार मानले.
