संदेश क्रांति न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील शिवस्मारक येथे आज रविवार (दि.१९ ) रोजी दुपारी ३ वाजता खानापूर तालुका पातळीवर संत गोरा कुंभार पुण्यतिथी साजरी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दि. संत गोरा कुंभार समाज विकास मंडळाचे अध्यक्ष भैरु कुंभार असतील. प्रमुख व्याख्याते म्हणून बीएसएनएलचे निवृत्त कर्मचारी एम. टी. कुंभार गोरा कुंभार यांच्या चरित्र्यावर मार्गदर्शन करणार आहेत. तालुक्यातील ११ गावातील वयोवृद्ध नागरिकांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाने दिली.
