#दि.२२ ते २९ एप्रिल पर्यत!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
तोपिनकट्टी ( ता. खानापूर ) येथील श्रीमहालक्ष्मी हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्याच्यावतीने इयत्ता पहिले ते दहावी पर्यतच्या विद्यार्थ्यासाठी सुंदर हस्ताक्षर प्रशिक्षण वर्गाचे आयोजन दि.२२ एप्रिल ते दि.२९ एप्रिल पर्यत श्रीमहालक्ष्मी हायस्कूल मध्ये आयोजित करण्यात आले आहे.
दि.२२ एप्रिल पासुन सकाळी १० ते ११ वाजेपर्यत इयत्ता १ली ते ४ थी वर्गासाठी, सकाळी ११ ते १२ वाजेपर्यत इयत्ता ५ वी ते ७ वी वर्गासाठी, दुपारी १२ ते १ वाजेपर्यत इयत्ता ८ ते १०वी वर्गासाठी असुन पुढील दिवसापासुन वेळा पत्रक सकाळी ९ते१० , सकाळी १० ते ११ तर सकाऴी ११ ते १२ पर्यत राहणार आहे.
तरी तोपिनकट्टी, बिदरभावी प्राथमिक व हायस्कूल विद्यार्थ्यासाठी २०० रू.फी, व बाहेरील विद्यार्थ्यासाठी ३०० रू फी राहणार आहे.
तरी विद्यार्थ्यानी याचा लाभ घ्यावा.असे आवाहन श्रीमहालक्ष्मी हाय स्कूलच्या माजी विद्यार्थ्यानी केले आहे.
