#स्कूलमधुन ओमकार भट्ट. ९४.४% मार्कसह प्रथम!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
तोपिनकट्टी ( ता.खानापूर) येथील श्रीमहालक्ष्मी ग्रुप एज्युकेशन सोसायटी संचालित शांतिनिकेतन पब्लिक स्कूल सीबीएसई दहावीचा निकाल १००टक्के
लागला असुन स्कूलमधुन परीक्षेला ८९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्व विद्यार्थी पास झाले.
स्कूलमधुन ओमकार भट्ट याने ९४.४ टक्के मार्क घेऊन प्रथम क्रमांक मिळविला.तर व्दितीय क्रमांक अन्वी शेट्टी हिने ८८.८ टक्के मार्कासह मिळविला.तर तृतीय क्रमांक ऋग्वेद पाटील याने ८६.२ टक्के मार्कासह मिळविला.
स्कूलचा निकाल१००टक्के लागला असुन एकूण ८९ विद्यार्थी परीक्षेला बसुन सर्व विद्यार्थी पास झाले.त्यापैकी २१ विद्यार्थी डिस्टींक्शनमध्ये उतीर्ण तर ३० विद्यार्थी प्रथम श्रेणीत,२० विद्यार्थी व्दितीय श्रेणीत तसेच १८ विद्यार्थी पास क्लासमध्ये उतीर्ण झाले आहेत.
यशस्वी विद्यार्थ्याचे स्कूलचे संस्थापक आमदार विठ्ठल हलगेकर, चेअरमन प्रा.भरत तोपिनकट्टी, सचिव प्रा.आर.एस पाटील,प्राचार्या सौ. स्वाती वाळवे आदीनी अभिनंदन केले आहे.यशस्वि विद्यार्थ्याचे खानापूर तालुक्यातुन अभिनंदन होत आहे.
