संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधि
खानापूर शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील आशिर्वाद हाॅस्पिटलमध्ये बेळगाव येथील जमबागी सुपरस्पेशालिटी आय इनस्टिटूट यांच्या संयुक्त विद्यामाने मोफत नेत्र तपासणी शिबीरात ४३ नेत्र रुग्णाची तपासणी करण्यात आली.
नेत्र तपासणी शिबीरात डॉ.वैष्णवी कम्मार ( ओप्थोमेट्रीक),डॉ.अभिषेक डोंगरे ( पीआरओ),नर्स अनुराधा व कर्मचारी अर्जुन आदी उपस्थित होते.
प्रारंभी खानापूर डाॅक्टर असोसिएशन चेअरमन डॉ डी ई नाडगौडा, डॉ एन एल
पाटील, यांच्याहस्ते शिबीराचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी खानापूर शहरासह तालुक्यातील अनेक खेड्यातील नागरीकांनी नेत्र तपासणी शिबीराचा लाभ घेतला.
