संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील जांबोटी क्राॅसवरील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर ऑटो रिक्षा असोसिएशनच्यावतीने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रारंभी आटो रिक्षा असोसिएशनचे अध्यक्ष रामचंद्र पाटील यांच्याहस्ते फोटो प्रतिमेला पुष्पहार घालुन पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाला अध्यक्ष रामचंद पाटील व उपाध्यक्ष प्रसाद कोळींद्रेकर सेक्रेटरी रुद्राप्पा मादार व लक्ष्मण मादार व बहू संख्येने रिक्षा असोसिएशन सभासद रिक्षा चालक उपस्थित होते.
हलकर्णी येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी”
खानापूर शहराजवळील हलकर्णी येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी अँड.आकाश आथणीकर यांच्याहस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याहस्ते फोटो प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
यावेळी खानापूर कंदबा फाउंडेशन असोसिएशनचे चेअरमन जाॅर्डन गोन्साल्विस व इतर मान्यवर उपस्थित होते.